मुंबई - अभिनेत्री दीपिका पदुकोणने आपला पॅरिसचा दौरा रद्द केला आहे. पॅरिस फॅशन वीकसाठी ती जाणार होती. मात्र कोरोना व्हायरसच्या भितीने तिने हा दौरा रद्द केला.
लुई वीटॉन द्वारे आयोजित लग्झरी फॅशन वीकसाठी दीपिका पदुकोणाला आमंत्रीत करण्यात आले होते. ३ मार्चपर्यंत हा शो चालणार होता.
कोरोना व्हायरसच्या भितीने दीपिकाने आपले पॅरिसला जाणे टाळले आहे.
दीपिकाच्या प्रवक्त्याने ही माहिती मीडियाला दिली आहे.