मुंबईः बॉलिवूडची प्रसिद्ध जोडपे रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण नुकतेच मुंबई विमानतळावर हौशी फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यात कैद झाले.
हे दोघेही दीपिका पादुकोणचे मूळ गाव बंगळूरहून परत मुंबईला आले. यादरम्यान हे दोघेही खूप खास आणि वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत होते.
या जोडप्याने नेमका एकसारखाच पोशाख परिधान केला होता. दोघांनी डेनिम जीन्स, ब्लॅक टी-शर्ट आणि पांढरे पादत्राणे परिधान केले होते तर रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण एकमेकांचे हात पकडताना दिसत होते. त्यांची ही शैली त्याच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.
हेही वाचा - एस एस राजामौलीच्या चित्रपटातून आलिया भट्टला वगळले, जागा घेणार प्रियंका चोप्रा?
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण, दोघेही लवकरच '' 83 'चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. यात दीपिका रणवीरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.
हा चित्रपट ख्रिसमसला रिलीज होऊ शकतो. सिनेमागृहात प्रेक्षकांनी चित्रपटाचा आनंद घ्यावा अशी निर्मात्यांची इच्छा आहे.