ETV Bharat / sitara

अनुष्का आणि विराटच्या क्राऊड फंडिंगमध्ये ११ कोटींची मदत

author img

By

Published : May 14, 2021, 10:34 PM IST

कोविड विरुध्दच्या लढाईसाठी निधीमध्ये मदत केलेल्या सर्वांचे आभार अनुष्का शर्माने मानले आहेत. ती आणि तिचा क्रिकेटर पती विराट कोहलीने कोरोना विरुध्दच्या लढाईसाठी निधी संकलन सुरू केले आहे. यासाठी अनेकजण मदतीचा हात पुढे करीत आहेत.

Anushka, Virat'
अनुष्का आणि विराट

मुंबई - अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने कोरोना विरुध्दच्या लढाईसाठी निधी संकलन सुरू केले आहे. यासाठी अनेकजण मदतीचा हात पुढे करीत आहेत. आतापर्यंत या निधीमध्ये ११ कोटी ३९ लाख ११ हजार ८२० रुपये मदत मिळाली आहे.

विराट आणि अनुष्काने ७ मे रोजी निधी संकलन सुरू केले. या जोडप्याने क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म केट्टो मार्फत आपली #इन धीस टुगेदर ही मोहीम सुरू केली. सुरुवातीला त्यांनी स्वतः २ कोटींचे दान केले होते.

अनुष्काने शुक्रवारी इन्स्टाग्रामवर सर्वांचे आभार व्यक्त करताना निधीमध्ये ११ कोटी ३९ लाख ११ हजार ८२० रुपये मदत मिळाली असल्याचे सांगितले.

हेही वाचा - गरजूंच्या मदतीला रस्त्यावर उतरला गायक मिका सिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.