मुंबई - अभिनेत्री परिणीती चोप्रा आगामी ‘अॅनिमल’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबत स्क्रिन स्पेस शेअर करणार आहे. अर्जुन रेड्डी चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
भूषण कुमारच्या टी-सीरिज फिल्म्सच्या वतीने ‘अॅनिमल’ या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.
टी सिरीजच्या वतीने अधिकृतपणे या चित्रपटाची आणि कलाकारांची घोषणा केली आहे. "साल की शुरुवात शिट्टी मारके होनी चाहिये", अशी पोस्ट लिहून चित्रपटाची घोषणा निर्मात्याने केली.
टी सिरीजने चित्रपटाची घोषणा केल्यानंतर अभिनेत्री परिणीती चोप्राने या बातमीला दुजोरा देणारी पोस्ट इन्स्टाग्रामवर लिहिली आहे. परिणीती आणि रणबीर व्यतिरिक्त या चित्रपटात अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
हेही वाचा - २०२० : वादग्रस्त बॉलिवूडकरांचे सोशल मीडियावर रंगलेले वाद
रणबीर कपूर आगामी ब्रह्मास्त्र, शमशेरा आणि लव रंजनची रोमँटिक कॉमेडीचे शुटिंग संपवल्यानंतर ‘अॅनिमल’ या चित्रपटाच्या सुटिंगला सुरुवात करेल. दरम्यान, परिणीती दिबाकर बॅनर्जीच्या "संदीप और पिंकी फरार"मध्ये दिसणार आहेत. रिभू दासगुप्ता दिग्दर्शित ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ या मनोवैज्ञानिक थ्रिलर चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्येही भूमिका करणार आहे.
हेही वाचा -स्वागत २०२१ : बॉलिवूडचे हे चित्रपट करणार बॉक्स ऑफिसवर धमाका