ETV Bharat / sitara

'टॉयलेट एक प्रेम कथा'च्या लेखकांसोबत कॉमेडी सिनेमात पुन्हा काम करणार अक्षय - कॉमेडी सिनेमात झळकणार अक्षय

सिद्धार्थनं सांगितलं, की अक्षयला या सिनेमाची कल्पना आवडली. त्यानंतर त्यानं आम्हाला या स्क्रिप्टमध्ये आणखी काही मुद्दे लिहिण्यास सांगितले. आम्ही या चित्रपटासाठी उत्सुक आहोत. अक्षयच्या आगामी सिनेमांचं वेळापत्रक पाहाता या सिनेमाच्या चित्रीकरणाला 2021 मध्ये सुरुवात होण्याची शक्यता सिद्धार्थनं वर्तवली.

akshay kumar upcoming films
अक्षय कुमार
author img

By

Published : Jun 14, 2020, 5:45 PM IST

मुंबई - लेखिका गरिमा वहल आणि सिद्धार्थ सिंग गोलिया की रासलीला रामलीला आणि टॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमांतील कामासाठी ओळखले जातात. आता ही जोडी लवकरच एक कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. यात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

या आगामी सिनेमाची कथा आणि डायलॉग लिहिण्यात सध्या ही जोडी व्यग्र आहे. चित्रपटाबद्दल त्यांनी सांगितलं, की हा एक विनोदी सिनेमा असणार आहे. यात कोणताही सामाजिक विषय दाखवला जाणार नसून यात एका व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आणि त्यामुळे नातेसंबंधांवर पडणारा प्रभाव दाखवला जाणार आहे.

सिद्धार्थनं सांगितलं, की अक्षयला या सिनेमाची कल्पना आवडली. त्यानंतर त्यानं आम्हाला या स्क्रीप्टमध्ये आणखी काही मुद्दे लिहिण्यास सांगितले. आम्ही या चित्रपटासाठी उत्सुक आहोत. अक्षयच्या आगामी सिनेमांचं वेळापत्रक पाहाता या सिनेमाच्या चित्रीकरणाला 2021 मध्ये सुरुवात होण्याची शक्यता सिद्धार्थनं वर्तवली.

या सिनेमाशिवाय सिद्धार्थ आणि गरिमा त्यांच्या आगामी सिनेमाच्या कास्टिंगमध्ये व्यस्त आहेत. दुकान या सिनेमातून हे दोघंही दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. तर दुसऱ्या सिनेमाचा विषय 'ऑनर किलिंग'वर आधारित असणार आहे. दुकान सिनेमा गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील सत्य घटनेवर आधारित आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.