मुंबई - लतादीदीच्या 90 व्या वाढदिवसाच निमित्त साधून तयार करण्यात आलेल्या 'लता 90' या खास पुस्तकाच प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. दादरच्या प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात हा कार्यक्रम पार पडला.
लतादीदीच प्रत्येक गाणं ऐकणाऱ्याला कायम ते आपल्यासाठीच गायलं गेल्याच समाधान मिळवून देत, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. यावेळी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, संगीतकार आनंदजी भाई यांच्यासह गायिका उत्तरा केळकर, दिदींचे बंधू हृदयनाथ मंगेशकर, त्यांची मुलगी राधा मंगेशकर हे या कार्यक्रमाला खास पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दिदींचा प्रत्येक वाढदिवस कायम आठवणीत राहावा. यासाठी त्यांचे चाहते कायम प्रयत्नशील असतात. 90 व्या वाढदिवसानिमित्त जीवनगाणीच्या प्रसाद महाडकर यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम देखील रसिक प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अशी पर्वणी ठरला आहे.