मुंबई - प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'साहो' हा बिग बजेट सिनेमा सुरूवातीपासूनच चांगलाच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा आणि प्रभास व्यतिरिक्त चित्रपटातील इतर कलाकारांचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात येत आहेत. अशात आता चित्रपटातील चंकी पांडेचा लूक समोर आला आहे.
चंकी पांडेनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या सिनेमात तो खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. यात तो देवराज नावाचे पात्र साकारणार आहे. चंकी पांडेचा पोस्टरमधील लूक त्याच्या पात्राबद्दलची उत्कंठा वाढवणारा आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान या चित्रपटात प्रभास, श्रद्धा कपूर आणि चंकी पांडे यांच्याशिवाय नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. काही दिवसांपूर्वीच निल नितीन मुकेशचा चित्रपटातील लूकही प्रदर्शित करण्यात आला होता. हा सिनेमा येत्या ३० ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.