मुंबई - सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन बोर्ड (सीबीएफसी) ने शुक्रवारी म्हटले आहे की, त्यांनी अभिनेता प्रतीक गांधी याची भूमिका असलेल्या भवाईच्या निर्मात्यांना प्रमाणपत्र नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि चित्रपटाच्या आशयामध्ये छेडछाड केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. गुजरातमधील लोकप्रिय लोकनाट्य प्रकाराबद्दल संगीत नाटकाचे नाव पूर्वी 'रावण लीला' असे होते. त्यानंतर लोकांच्या धार्मिक भावना दुखवू नयेत यासाठी हे शीर्षक बदलून 'भवाई 'असे करण्यात आले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन हार्दिक गज्जर यांनी केले आहे आणि पेन स्टुडिओने याची निर्मिती केली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
भवाईच्या निर्मात्यांनी नियमांचे उल्लंघन केले
सीबीएफसीच्या मते, निर्मात्यांनी ट्रेलरमध्ये शीर्षक बदलले आणि काही नवीन आशयाचा समावेश केला. सीएफबीसीने 'भवाई'च्या निर्मात्यांकडून प्रमाणपत्र नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि चित्रपटाच्या आशयामध्ये छेडछाड केल्याबद्दल स्पष्टीकरण मागितले आहे. सीबीएफसीने नेहमी आपल्या मार्गदर्शक तत्त्वांशी खरे राहण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रमाणन प्रक्रिया शक्य तितकी सोपी आणि पद्धतशीर बनवली आहे, असे सीबीएफसीचे प्रमुख प्रसून जोशी यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
भवाईच्या आशयात बदल
गेल्या आठवड्यात 'भवाई'चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर निर्मात्यांनी दोन बदल करून चित्रपटाचे शीर्षक बदलले. या चित्रपटात राम आणि रावण यांच्यातील असलेला संवाद काढून टाकण्यात आला होता.
भवाईच्या निर्मात्यांना कारणे दाखवा नोटीस
सीबीएफसीने सांगितले की, बदल करण्यात आलेला ट्रेलर हे सिनेमॅटोग्राफ प्रमाणन नियमांचे उल्लंघन आहे. निर्मात्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन स्पष्टीकरण मागितले आहे आणि त्यांचे उत्तर सध्या विचाराधीन आहे. पेन स्टुडिओने यावर अद्याप उत्तर दिलेले नाही.
'भवाई' चित्रपटामध्ये इंद्रिता रे, राजेंद्र गुप्ता, राजेश शर्मा आणि अभिमन्यू सिंह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 1 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - रावणाचे उदात्तीकरण केल्याचा आरोप, शीर्षक बदलूनही 'भवाई'बद्दलचे नाटक सुरूच