मुंबई - आज सोमवारी दोन हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये होते. यात सर्वात पहिला होता #BoycottKhans हा ट्रेंड. या माध्यमातून सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येबाबात बॉलिवूडमधील तिन्ही खानवर आरोप केला जात होता. यात सलमान, आमिर आणि शाहरुख खानवर राग व्यक्त केला जात होता.
सुशांतच्या अनैसर्गिक मृत्यूनंतर या वादाला तोंड फुटले. सुशांतेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु काही लोक बॉलिवूडमधील नेपोटिझ्मवर आरोप करत आहेत. यात सर्व खान यांची महत्त्वाची भूमिका आहे.
दुसरा ट्रेंडिंगमध्ये असलेला हॅशटॅग SupportSelfMadeSRK हा आहे. याला शाहरुख समर्थक सपोर्ट करत आहेत. एका युजरने ट्विटरवर म्हटलंय, ''बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये सर्व खान यांना बॅन करा. म्हणजे यांना कळेल की टॅलेंट फक्त बॉलिवूडच्या गॉडफादरच्या घरी जन्माला येत नाही. यशराज फिल्म्स आणि सात प्रॉडक्शन हाऊसना या तीन राज्यात बंदी घातली पाहिजे.''
आणखी एका युजरने म्हटलंय, ''भ्रष्ट सरकार सुशांतला न्याय देऊ शकत नाही. परंतु आपण सर्वजण मिळून देऊ शकतो.''
आणखी युजरने लिहिलं., ''सुशांतसिंह राजपूत खरा नायक आणि चांगल्या मनाचा माणूस होता.'' तर दुसऱ्या युजरने लिहिलं., ''प्रिय शाहरुख याच्यात काही वाद नाही की, तू बेस्ट आहेस, परंतु सुशांतच्या निधनानंतर मी तूझा तिरस्कार करतो. तुझ्या फोनमध्ये सुशांतचा एकही फोटो नाही. तूदेखील सर्वांसारखाच निघालास.''
याच वेळी शाहरुख खानच्या फॅन्सनी दावा केलाय की, ''त्याचा इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही. तो पूर्णपणे बाहेरचा आहे. परंतु खूप मेहनतीने त्याने आपले स्थान बॉलिवूडमध्ये निर्माण केलंय. यासाठी शाहरुखच्या चाहत्यांनी हॅशटॅग SupportSelfMadeSRK ट्विट करणे सुरू केले.''
शाहरुखच्या फॅनने लिहिलंय, "#SupportSelfMadeSRK, कारण प्रत्येक बाहेरच्या मध्यमवर्गियांसाठी तो एक प्रेरणास्थान आहे, जो बॉलिवूडमध्ये येण्याचे स्वप्न पाहतो.''
एका चाहत्याने लिहिलंय, "राजकुमार राव, सुशांत सिंह, आयुष्मानने म्हटलंय की शाहरुख खान त्यांच्यासाठी प्रेरणास्थान राहिला आहे. कारण तो स्वतः एक स्टार बनलाय.''