मुंबई - निर्माता करण जोहरचा आगामी तख्त हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमाचा स्क्रिप्ट रायटर हुसेन हैदरीच्या ट्विटनंतर या वादाला तोंड फुटले आहे.
ट्विटरवर सध्या बायकॉट तख्तचा ट्रेंमड सुरू आहे. इंटरनेट युजर्स हुसेन हैदरीवर टीकेचा भडीमार करीत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार हुसेन यांचे ट्विटर अकाऊंट लॉक आहे. परंतु त्याच्या ट्विटरवरुन हिंदू दहशतवादीचा उल्लेख झाला होता. यावरुन त्याच्यावर टिका होत असून तख्तवर याचा राग निघत आहे.
''#बायकॉट तख्त.धर्मा प्रॉडक्शनचा व्यक्ती हिंदू धर्माला रात्रंदिवस शिव्या घालत असेल तर आम्ही तख्त बायकॉट करू'', असे एका युजरने म्हटलंय.
एक युजर म्हणतो, ''हा व्यक्ती तख्तचा रायटर आहे. निलाजरा करण जोहर अजूनही त्याच्यासोबत सिनेमा बनवत आहे....आणि निर्लज्ज हिंदू थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणार आहेत. # बायकॉट तख्त.''
अशा आशयाचे असंख्य ट्विट पाहायला मिळत आहेत. तख्त चित्रपटात रणवीर सिंह, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे शूटींग मार्चमध्ये सुरू होणार आहे.