ETV Bharat / sitara

प्रवासी मजूरांना मोफत घरी पोहोचवा, बॉलिवूडकरांनी केले आवाहन - ent

प्रवासी मजूरांना रेल्वेतून आपल्या राज्यात पाठवण्यात येत आहे. यासाठी त्यांच्याकडून भाडे आकारले जात आहे. या मजूरांना मोफत प्रवास करु द्यावा अशी मागणी बॉलिवूडच्या काही कलाकारांनी केली आहे.

BOLLYWOOD-URGES-GIVE-MIGRANT-WORKERS-FREE-TRAIN-TRIPS-BACK-HOME
प्रवासी मजूरांना मोफत घरी पोहोचवा
author img

By

Published : May 4, 2020, 8:30 PM IST

मुंबई - लॉकडाऊनच्या काळात अडकलेले प्रवासी मजूर आपल्या राज्यात परतत आहेत. यासाठी त्यांच्याकडून भाडे घेण्यात येत आहे. त्यांना मोफत प्रवास करु द्यावा अशी मागणी बॉलिवूडच्या काही कलाकारांनी केली आहे.

  • We as a country should bear the cost of migrants going back to their homes. Train services should be free. They (Labourers) are already burdened with no pay & no place to stay compounded with the fear of #covid19 infection. pic.twitter.com/lKK5KfKz7u

    — Riteish Deshmukh (@Riteishd) May 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

खूप अडचणींचा सामना करीत हे मजूर घरी परतत आहेत. याबद्दल अभिनेता रितेश देशमुखने ट्विटरवर लिहिलंय, "प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा खर्च देश या नात्याने आपण केला पाहिजे. ट्रेन सुविधा मोफत असायला पाहिजे. हे मजूर अगोदरच काम नसल्यामुळे ओझ्याखाली दबलेले आहेत."

  • I feel the travel of all migrants to their respective homes should be totally free. Infact they should be given some money so that when they reach their homes atleast they have something to survive for a day or two. Free trains & busses should run from every state @MoHFW_INDIA pic.twitter.com/jw5pTviGxX

    — sonu sood (@SonuSood) May 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सोनू सुदने आपले मत मांडताना लिहिलंय, "मला वाटते, प्रवाशांना त्यांना घरापर्यंत पोहोचण्याचा प्रवास मोफत असला पाहिजे. उलट त्यांना घरी पोहोचल्यानंतर खर्चासाठी पैसे देणे आवश्यक आहे. मोफत ट्रेन आणि बसेस सर्व राज्यातून सुरू झाल्या पाहिजेत."

  • Since the govt of Indian and its states have decided to charge the unemployed starving homeless and helpless migrant worker for the railway ticket . Let some credible NGO raise funds to help these migrant workers to pay for their travel . We all will donate for this cause.

    — Javed Akhtar (@Javedakhtarjadu) May 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जावेद अख्तर यांनी आपल्या ट्विटरवर लिहिलंय, "सरकार आणि राज्यांनी भुकेल्या, बेघर आणि बेसहारा मजूरांकडून तिकीट वसूली सुरू केली आहे. काही जबाबदार एनजीओने त्यांच्या मदतीसाठी फंड जमा करायला सुरुवात केली पाहिजे. आम्ही त्यात मदत करू."

अभिनेता रणवीर शौरीने एअर फोर्सने केलेल्या फुलवृष्टीवर निशाना साधत लिहिले आहे, "गरिबांसाठी मोफत ट्रेन सुरू करण्याऐवजी विमानातून फुलं टाकली जात आहेत. नवी पार्लमेंट बिल्डिंग, एमपीच्या ऐवजी...जाने भी दो, यारों... @PMOIndia @HMOIndia @RailMinIndia."

यांच्या शिवाय अभिनेता आदिल हुसेन आणि संध्या मृदुल यांनीही प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराबद्दल शिंतोडे उडवले आहेत.

For All Latest Updates

TAGGED:

ent
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.