मुंबई - बॉलिवूडचा लोकप्रिय स्टार रणवीर सिंगच्या चाहत्यांनी त्याला समर्पित गीत सादर केले आहे. 'बॉलिवूड का किंग, रणवीर सिंग' असे या गीताचे बोल आहेत.
2019 मध्ये रिलीज झालेल्या 'गली बॉय' चित्रपटातील रणवीरच्या रॅप गाण्यावरुन या गीताला प्रेरणा मिळाली आहे. रणवीर सिंगच्या अहमदाबादमधील फॅन क्लबने तयार केलेल्या या गाण्यात त्याच्या पदार्पणाचा चित्रपट 'बँड बाजा बारात' ते 'गल्ली बॉय' पर्यंतच्या प्रवासाचे वर्णन करण्यात आले आहे.
"रणवीरमुळे चाहत्यांना खरोखरच प्रेरणा मिळाली आहे. त्याचा प्रवास, त्याची कहाणी आणि त्यांच्याशी संबंधित हे गाणे आहे. अभिनयाच्या कौशल्यामुळे मोठ्या झालेल्यांमध्ये रणवीर सिंग एक आहे. त्याच्या वाढदिवसाला या नव्या अँथम गाण्याच्या संकल्पनेसह चाहते पुढे आले आहेत. हे गाणे रणवीरच्या गली बॉय स्टाईलचे आहे'', असे सूत्राने सांगितले. यासाठी त्यांनी चार महिन्याचा काळ घालवला आहे.
" संपूर्ण भारत लॉकडाऊन स्थितीमध्ये असूनही, रणवीरच्या वाढदिवसासाठी चाहत्यांनी हे गाणे तयार केले.'', असे त्याने पुढे सांगितले.
हेही वाचा - राणा दग्गुबातीचे आभासी कुटुंब बळकट, इन्स्टाग्रामवर झाले ४० लाख फॉलोअर्स
6 जुलै रोजी रणवीर सिंगचा वाढदिवस साजरा झाला.
रणवीर सिंगने २०१० मध्ये 'बँड बाजा बारात' या रोमँटिक विनोदी चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. त्याने गोलियां की रसलीला: राम-लीला, लूटेरा, दिल धड़कने दो, बाजीराव मस्तानी, पद्मावत, सिंबा आणि गल्ली बॉय या चित्रपटांत काम केले आहे.
रणवीर सिंग आगामी "83" आणि ''जयशेभाई जोरदार'' या चित्रपटात काम करीत आहे.