मुंबई - बॉलिवूडमध्ये सध्या तरुणाईला आकर्षित करण्यासाठीची जणू स्पर्धाच सुरू आहे. 'यारम' या नव्या चित्रपटाच्या रिलीजची तयारी झाली आहे. या सिनेमाचा युथफुल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'यारम' हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. याश्वी फिल्म्सची निर्मीती असलेला हा चित्रपट आवेस खान यांनी दिग्दर्शित केलाय. अभिनेता प्रतिक बब्बर, सिध्दार्थ कपूर, इशिता राज, सुभा राजपूत, अनिता राज, दिलीप ताहिल यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. नताशा स्टँकोविक हिचा यात स्पेशल अॅपिरन्स आहे.
तरुणाईला चित्रपटगृहाकडे वळवण्याची क्षमता 'यारम' या चित्रपटात असल्याचे ट्रेलरवरुन जाणवते. १८ ऑक्टोबर २०१९ ला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.