वाशिम - ‘सागर’,‘सलाखे’, ‘क्रांतिवीर’, ‘शहंशाह’ ‘मैं खिलाडी तू अनाडी’, ‘अनाडी’, ‘१०० डे’ सारख्या चित्रपटांमधून बॉलीवूडमध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या १७७ चित्रपटांसह हॉलीवूडच्या चार चित्रपटांचे कला दिग्दर्शक असलेले लीलाधर सावंत चित्रपटसृष्टीतील एक बडी आसामी. या क्षेत्रातील फिल्मफेअर सारखा उच्च पुरस्कार मिळवणाऱ्या या अवलियाला सध्या मदतीची गरज आहे.
अहोरात्र मेहनत करून पडद्यावर कलाकारांचा अभिनय वास्तव करणाऱ्या कला दिग्दर्शकाची वास्तव जीवनातील परिस्थिती पाहता बॉलिवूड किती पाषाण हृदयी आहे याचे जिवंत उदाहरण आहे. सावंत यांनी मुंबईमध्ये सुरुवातीला एका कला दिग्दर्शकाकडे सहायक म्हणून काम केले. पण संधी मिळाली तेव्हा स्वत:चे कौशल्यही सिद्ध केले नाहीतर त्यामध्ये यशस्वीही झाले. एक दोन नव्हे तर तब्बल 177 चित्रपटामध्ये कला दिग्दर्शन म्हणून आपली भूमिका ही पार पाडली. एवढ सर्व प्राप्त करूनही सावंत यांच्यावर अचानक नियतीने मोठा आघात केला. त्यांचाच वारसा घेऊन कलेच्या क्षेत्रात सुरुवात करू पाहणारा त्यांचा मुलगा विशाल 14 वर्षांपूर्वी कॅन्सरने हे जग सोडून गेला. या आघाताने प्रचंड निराश झालेले सावंत मायानगरीतील चंदेरी दुनिया सोडून वाशिम जिल्ह्यातील जऊळका या त्यांच्या गावाकडे परतले.
आपल्या उमेदीच्या काळात अनेक नवोदितांना अभिनय क्षेत्रात ओळख निर्माण करून देणाऱ्या व्यक्तींची ओळखच आज त्याच बॉलीवूडला नसणे यापेक्षा लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल. यशाच्या काळात सर्वांशी सलोख्याचे संबंध प्रस्तापित करून पैशाची तमा न बाळगणाऱ्या लीलाधर सावंत यांना आर्थिक फसगत व निराशेमुळे अधिक मानसिक धक्का बसत गेला. एका वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेज व पॅरालिसिसचा आघात बसला.
त्यांच्या उतार वयात औषधालाही पैशाची चणचण भासणे हे झगमगाटात व चंदेरी दुनियेत वावरणाऱ्या तमाम कलाकारांसाठी शरमेची बाब म्हणावी लागेल. जऊळका येथे आल्यापासून सावंत यांनी सर्वांना मदतीचा हात दिला. मात्र आज त्यांना खरोखर मदतीची अपेक्षा असतांना मात्र बॉलिवूडच्या कला दिगदर्शकाकडे सर्वांनी पाठ फिरविल्याच चित्र पाहायला मिळत आहे.
नाना पाटेकर ,जॅकी श्रॉफ,अक्षय कुमार ,रोहित शेट्टी,मिथुन चक्रवर्ती,अजय देवगण,गोविंदा शाहरुख खान ही बॉलीवूड मधील नामांकित व्यक्तिमत्व अगदी चांगल्या पद्धतीने ओळखत असलेल्या कला दिग्दर्शक लीलाधर सावंत यांना त्यांचा हालकीच्या परिस्थिती मध्ये सहकारी म्हणून आर्थिक मदत करतील का? या आशेवर लीलाधर सावंत हे आजही त्या वाशीम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे येथे अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. अशा हलाकीच्या परिस्थितीमध्ये असलेल्या कला दिग्दर्शकावर बॉलिवूडचे कला प्रेमी मदतीचा हात देणार का? हे पाहन महत्त्वाचे ठरेल.
हेही वाचा - ''रात्रीस खेळ चाले''च्या ऑल इन वन साळगावकरला 'वेध' पुन्हा मालिका सुरू होण्याचे