ETV Bharat / sitara

सुशांतसिंगच्या कंपन्यांमध्ये रिया आणि तिच्या भावाने अनियमितता केल्याची शक्यता -बिहार पोलिसांचा तपास - सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला रिया चक्रवर्ती जबाबदार

रिया विरोधात बिहारमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर या संदर्भात अटक टाळण्यासाठी तीही सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल करणार असल्याचे कळत आहे.

Sushant Singh's suicide case
सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण
author img

By

Published : Jul 29, 2020, 1:18 PM IST

Updated : Jul 29, 2020, 6:04 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. दरम्यान सुशांतच्या वडिलांनी बिहार पोलिसांकडे रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणात आता बिहार पोलिसांकडून तपास केला जातोय.

सुशांतसिंगच्या कंपन्यांमध्ये रिया आणि तिच्या भावाने अनियमितता केल्याची शक्यता -बिहार पोलिसांचा तपास

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बिहार पोलिसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले आहे. सुशांतच्या २ कंपनीच्या आर्थिक देवाण-घेवाणीच्या संदर्भातील कागदपत्रांची चौकशी बिहार पोलिसांकडून करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या Vividrage RhealityX Pvt Ltd व Front India for World Foundation या दोन कंपनी होत्या. या दोन्ही कंपनीवर सुशांत याच्याबरोबर संचालक म्हणून रिया व तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांचीसुद्धा नावे आहेत. बिहार पोलिसांच्या मते या कंपनीच्या व्यवहारात बरीच अनियमितता असण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट फायदा रिया व तिचा भाऊ शोविक यांना झाला आहे. या बरोबरच बिहार पोलीस सुशांत याच्या सीएशीसुद्धा बिहार पोलीस संपर्क साधत आहेत. मुंबई पोलीस व बिहार पोलीस या दोघांचा तपास वेगवेगळ्या पद्धतीने सुरु आहे.

हेही वाचा - कोरोनाने तुझा मृत्यू व्हावा.. हेटर्सच्या वाक्याने भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले..

दरम्यान रिया विरोधात बिहारमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर या संदर्भात अटक टाळण्यासाठी तीही सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल करणार असल्याचे कळत आहे. मात्र, या संदर्भात तिचे वकील अ‌ॅड. सतीश मानेशिंदे यांच्याशी संवाद साधला असता या संदर्भात त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला आहे.

Last Updated : Jul 29, 2020, 6:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.