मुंबई - अमिताभ बच्चन यांच्या सुपरहिट 'अमर अकबर अँथनी' चित्रपटाला आज ४२ वर्ष पूर्ण झाले आहेत. या अॅक्शन कॉमेडी चित्रपटात अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, ऋषी कपूर, नीतू सिंग, परवीन बाबी आणि शबाना आझमी या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. तर अमिताभ यांच्याच 'बंटी और बबली' चित्रपटाला आज १४ वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने अमिताभ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
'बंटी और बबली' चित्रपटात अमिताभ यांनी मुलगा अभिषेक बच्चनसोबत स्क्रीन शेअर केली होती. यात अभिषेकच्या अपोझिट राणी मुखर्जी झळकली होती. अमिताभ यांनी या दोन्ही चित्रपटांचे पोस्टर शेअर करत त्याला कॅप्शन दिले आहे. 'अमर अकबर अँथनी'ला ४२ तर 'बंटी और बबली'ला १४ वर्ष आज पूर्ण झाले आहेत. 'अमर अकबर अँथनी' चित्रपट मुंबईतील २५ सिनेमागृहांत २५ आठवडे सुरू होता. तर 'बंटी और बबली'मधील 'कजरा रे' गाणं आजही प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर आहे, असे कॅप्शन अमिताभ यांनी दिले आहे.
![big b](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3394216_ab2.jpg)
'अमर अकबर अँथनी' चित्रपटाचं दिग्दर्शन मनमोहन देसाई यांनी केलं आहे. तर कादर खान यांनी या चित्रपटातील डायलॉग लिहिले होते. तर २००५ मध्ये आलेल्या 'बंटी और बबली' चित्रपटाचं दिग्दर्शन शाद अली यांनी केलं होतं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ६३ कोटींची कमाई केली होती.
![big b](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3394216_ab.jpg)