मुंबई - अमिताभ यांनी दिवाळीच्या निमित्ताने एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडच्या तारे तारकांची मांदियाळी पाहायला मिळाली.
बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या जलसा बंगल्यात दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. याला फिल्म इंडस्ट्रतील तमाम सेलेब्रिटीजनी हजेरी लावत आनंद लुटला. यावेळी अमिताभ यांची मुलगी श्वेता नंदा सर्व पाहुण्यांचे आनंदाने स्वागत करताना दिसली. अमिताभ यांच्यासोबत अनेक चित्रपट केलेल्या अभिनेत्री हेमा मालिनी यांनी हजेरी लावली होती.
अनुपम खेर पत्नी किरण खेर आणि मुलगा सिकंदर खेर यांच्यासह हजर होते. अभिनेता ऋषी कपूर पत्नी आणि मुलीसह दिसून आले. अभिनेता जितेंद्र परिवारासह हजर होते. अभिनेत्री काजल मुलांसह उपस्थित होती. टायगर श्रॉफ आणि श्रध्दा कपूरने परिवारासह हजेरी लावली. संजय कपूर मुलगी शनाया आणि पत्नीसह हजर होते. वरुण धवन गर्लफ्रेंड नताशासह हजर होता. खिलाडी कुमारही कुटुंबासह हजर होता. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान पत्नीसह हजर होता तर राजकुमार राव गर्लफ्रेंडसह हजर होता.
तारा सुतारिया कथित बॉयफ्रेंड आदर जैनसह हजर होती. झोया अख्तरने गली बॉयच्या सिध्दांतसह एन्ट्री केली. विराट कोहली अनुष्का शर्मा, पत्नीसह दुलकर सलमान, पती करणसोबत बिपाशा बसू, अंगद बेदीसह नेहा धुपिया दिवाळी पार्टीचे पाहुणे होते. इशान खट्टर आणि पत्नी मीरासह शाहिद कपूर सहभागी झाला. सानिया मिर्झा, परिणीती चोप्रा आणि फराह खान एकत्र दिसल्या, मलायका आणि अमृता शानदार अंदाजात दिसल्या. सारा अली खान आई आणि भावासह हजर होती. बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी, तब्बू, रविना टंडन, कृती खरबंदा, हुमा कुरेशी, कृती सेनन, आदिती राव हैदरी, जान्हवी कपूर, इलियाना डिक्रुझ, कियारा अडवाणी, दिया मिर्झा, अनन्या पांडे, नुसरत भरुचा, पूजा हेगडे, कटरिना कैफ, तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर आपला जलवा दाखवताना दिसून आल्या.
याबरोबरच सिध्दार्थ मल्होत्रा, कार्तिक आर्यन, विकी कौशल , अनिल कपूर, गायक सलिम मर्चंट, दिव्या दत्ता, रणदीप हुडा, निकिता दत्ताही पार्टीत सहभागी झाले होते. ईटीव्ही भारत सितारा रिपोर्ट.