ETV Bharat / sitara

जेव्हा पहिल्यांदाच चित्रीकरणादरम्यान सेटवर येते तापसी आणि भूमीची आई - saand ki aankh

या व्हिडिओत तापसी आणि भूमी दोघींच्याही आई सेटवर आलेल्या पाहायला मिळत आहेत. त्यांना पाहून या अभिनेत्री भावूक झाल्या आहेत. आई पहिल्यांदाच माझ्या एखाद्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सेटवर आल्याचे सांगत त्या आपला आनंद व्यक्त करत आहेत.

तापसीने शेअर केला व्हिडिओ
author img

By

Published : May 12, 2019, 2:04 PM IST

मुंबई - आज मदर्स डे निमित्त सर्वच आपल्या पद्धतीने आईला शुभेच्छा देत हा खास दिवस साजरा करत आहेत. मग यात कलाकार तरी मागे कसे असतील. नुकताच तापसी आणि भूमीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 'सांड की आँख' चित्रपटाच्या सेटवरील आहे.

या व्हिडिओत तापसी आणि भूमी दोघींच्याही आई सेटवर आलेल्या पाहायला मिळत आहेत. त्यांना पाहून या अभिनेत्री भावूक झाल्या आहेत. आई पहिल्यांदाच माझ्या एखाद्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सेटवर आल्याचे सांगत त्या आपला आनंद व्यक्त करत आहेत.

तापसीने शेअर केला व्हिडिओ

यासोबतच 'सांड की आँख'मधील आपला हा लूक पाहून आपल्या आईने सेटवर येताच हसायला सुरूवात केल्याचे तापसी या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तापसीने हा व्हिडिओ शेअर करत त्याला कॅप्शनही दिले आहे. हा व्हिडिओ त्या महिलांसाठी आहे ज्यांनी लहानपणापासून आपल्या वडिलांचं ऐकलं, लग्न झाल्यावर पतीचं ऐकलं आणि त्यानंतर ती फक्त आपल्या मुलांसाठी सर्व काही करत राहिली. या सर्वादरम्यान ती स्वतःच जीवन जगणंच विसरून गेली, कदाचित आपल्याला हे सांगण्यासाठी की, मी अशा पद्धतीने जीवन जगलंय, पण तू स्वतःचं जीवन मोकळेपणाने जग, असे तिने यात म्हटले आहे.

Intro:Body:

ENT 02

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.