ETV Bharat / sitara

भूमी पेडणेकर आणि बहीण समिक्षा... 'जुळ्या बहिणी?' - भूमी पडणेकरची बहिण

भूमी आणि समिक्षा पेडणेकर यांच्या वयात सुमारे तीन वर्षांचे अंतर आहे. मात्र दोघींना एकत्र फोटोत पाहिले तर त्या जुळ्या असल्यासारखेच दिसते. यामुळे तिला जुळी बहिण आहे का अशी विचारणा होत असते. भूमीची बहिण समिक्षा पेशाने वकील आहे.

Bhumi Pednekar And Sister Samiksha
भूमी आणि समिक्षा पेडणेकर
author img

By

Published : Aug 11, 2020, 4:38 PM IST

मुंबई - अभिनेत्री भूमी पडणेकरची बहीण अगदी तिच्यासारखी दिसते हे अनेकांना माहिती नसेन. पण जेव्हा फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले, तेव्हा अनेकांना असा प्रश्न पडला की या दोघी बहिणी तर नाहीत? त्याचे झाले असे की, भूमीची बहीण समिक्षा हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोला तिने 'जस्ट अस', असे कॅप्शन दिले होते. हा फोटो भूमीने रिपोस्ट केला. त्यावर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या.

एका चाहत्याने कॉमेंटमध्ये विचारले की, "तुम्ही दोघेही जुळ्या दिसत आहात." तर दुसऱ्याने लिहिले "जुडवा." त्यानंतर जुळ्यांच्या इमोजी असलेल्या चिन्हांचा वर्षाव सुरू झाला आणि पुन्हा भूमीला विचारणा होऊ लागली, "मी पुन्हा विचारत आहे, तुम्ही " भूमी आणि समिक्षा यांच्या वयामध्ये तीन वर्षांचे अंतर आहे. भूमी बॉलिवूडची लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्री असून समिक्षा वकील आहे. समिक्षाने तिच्या बहिणीची पोस्ट शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिले, "आमच्या स्वतःची एक भाषा आहे."

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात समिक्षाच्या वाढदिवशी भूमीने फोटोंच्या अल्बमसह एक भावनिक पोस्ट लिहिली होती. यात तिने सामुवर भरपूर प्रेम करीत असल्याचे लिहिताना आई आणि मला तू आमच्या आयुष्यात आल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचे म्हटले होते. या अल्बममधील प्रत्येक फोटो ओरडून सांगतो की आम्ही आयुष्यात भागीदार आहोत, असेही भूमीने लिहिले होते. भूमी १८ वर्षाची असताना ती आणि तिच्या बहिणीच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरपले होते.

पेडणेकर बहिणींचे आणखी काही फोटो येथे आहेत जे कदाचित आपणास आणखी आनंद देतील.

भूमी पेडणेकर हिने दम लगा के हैशा, टॉयलेट: एक प्रेम कथा, शुभ मंगल सावधान सोनचिडिया, साँड की आँख, बाला आणि पति पत्नी और वो हे तिचे काही लोकप्रिय चित्रपट आहेत. 2020 मध्ये रिलीज झालेल्या भूत - भाग एक: द हॉन्टेड शिपमध्ये ती विकी कौशलसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. ती आगामी ‘डॉली किट्टी और वो चमकते सितारे’ आणि ‘दुर्गावती’ सारख्या चित्रपटात झळकणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.