मुंबई - अभिनेत्री यामी गौतमने शुक्रवार दिग्दर्शक आदित्य धर (Aditya Dhar) याच्यासोबत लग्नगाठ बांधली. तिने सशल मीडियावरुन ही माहिती आपल्या चाहत्यांना कळवली होती.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
लग्न सोहळ्यात यामी गौतमने लाल रंगाची साडी परिधान केली होती आणि पारंपरिक दागिन्यांनी मढली होती. तर आदित्य धर याने हस्तिदंत रंगाची शेरवानी परिधान केली होती. लग्नाच्या सोहळ्याचा फोटो समाज माध्यमावर शेयर करत यामीने या विवाहाबाबत घोषणा केली आणि लिहिले....‘आमच्या कुटुंबियांच्या आशीर्वादाने आम्ही आज जिव्हाळ्याच्या वातावरणात विवाह सोहळ्यात लग्नगाठ बांधली आहे. आम्ही खूप खासगी लोक असल्यामुळे हा आनंददायक प्रसंग केवळ आमच्या जवळच्या कुटुंबासमवेत साजरा केला. आम्ही प्रेम आणि मैत्रीच्या प्रवासाला सुरुवात करीत असताना आम्ही आपले सर्व आशीर्वाद आणि शुभेच्छा मागत आहोत. प्रेम, यामी आणि आदित्य...’
यामीच्या मोहक रुपाने सर्वांची मने जिंकली
यामी गौतमच्या नव्या फोटोतील मोहक रुपाने सर्वांचीच मने जिंकली आहेत. शनिवारी तिने मेहंदीच्या कार्यक्रमातील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. यावेळी तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले असून यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

यामी गौतमच्या मेहंदीचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. तिच्या या फोटोवर भरपूर प्रतिक्रिया मिळत आहेत. शुक्रवारी यामीने लग्नाची अचानक घोषणा केल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

आदित्य धर याने दिग्दर्शित केलेला ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ हा सत्य घटनेवरील चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला होता आणि त्याला उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच त्याच्या चित्रपटाचा प्रमुख कलाकार विकी कौशललाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यामी गौतमचीही ‘उरी’ मध्ये प्रमुख भूमिका होती आणि या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान यामी आणि आदित्यच्या मैत्रीतील रूपांतर प्रेमात झाले आणि आता ते विवाहबद्धही झाले. आदित्य धर दिग्दर्शित आणि विकी कौशल अभिनित ‘अश्वत्थामा’चे सध्या चित्रीकरण सुरु आहे.
हेही वाचा - सोनू सूदच्या घराबाहेर कोविडमुळे रंजल्या गांजलेल्यांची रीघ