मुंबई - यावेळी कुणाल कपूर सामाजिक विषयावरील चित्रपटातून भव्य स्क्रिनवर झळकण्यासाठी सज्ज झालाय. बदमाशगिरीचा शिकार झालेल्या शालेय मुलाच्या भोवती ही कथा गुंफण्यात आली आहे. नोबेलमन २८ जूनला प्रदर्शित होत आहे.
निर्मात्यांनी या सायकॉलॉजिकल थ्रिलरचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. यात कुणाल शिक्षकाची भूमिका साकारतोय. रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये ब्लॅकबोर्डसमोर अभा असलेला कुणालचा अर्धा चेहरा दिसत असुन उलटा असलेला अर्धा चेहरा विद्यार्थ्याचा दिसत आहे. नोबेलमनचे शीर्षकाची शेवटची अक्षरे रक्ताळलेली दिसत आहेत.
नोबेलमन चित्रपटात अली हाजी, मोहम्मद अली मीर, मुस्कान जाफरी, शान ग्रोव्हर आणि सोनी राजदान यांच्या मुख्य भूमिका आहेत. वंदना कटारिया यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. मसुरीच्या प्रतिष्ठीत शाळेत याचे शूटींग पार पडले आहे.
कुणाल कपूर आपल्याला आलिया भट्ट आणि शाहरुख खानसोबत 'डियर जिंदगी'मध्ये शेवटचा दिसला होता.