ETV Bharat / sitara

'बसंती नो डान्स', 'सुपर ३०'मधील 'हिंग्लिश' गाणं प्रदर्शित - hritik roshan

मुलांच्या मनातील इंग्लिशविषयीची भीती काढण्यासाठी हृतिक त्याच्या विद्यार्थ्यांना होळीच्या दिवशी इंग्लिशमध्ये गाण्यास सांगतो. हाच प्रयत्न करताना ही मुलं हिंदी आणि इंग्लिश मिश्रित गाणं म्हणतात.

'सुपर ३०'मधील 'हिंग्लिश' गाणं प्रदर्शित
author img

By

Published : Jun 29, 2019, 5:11 PM IST

मुंबई - गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित 'सुपर ३०' चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. यासोबतच चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यानंतर आता आणखी एक गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

'बसंती नो डान्स' असं या गाण्याचं शीर्षक आहे. हे गाणं इंग्लिश आणि हिंदी मिश्रित आहे. मुलांच्या मनातील इंग्लिशविषयीची भीती काढण्यासाठी हृतिक त्याच्या विद्यार्थ्यांना होळीच्या दिवशी इंग्लिशमध्ये गाण्यास सांगतो. हाच प्रयत्न करताना ही मुलं हिंदी आणि इंग्लिश मिश्रित गाणं म्हणतात.

जगात असे खूप दरवाजे आहेत, जे यामुळे उघडत नाहीत कारण लोक मे आय कम इन इंग्लिशमध्ये म्हणत नाहीत, असा डायलॉग हृतिक गाण्याच्या शेवटी म्हणतो. या गाण्याला जनार्दन धातराक, दिव्या कुमार आणि चैताली परमार यांनी आवाज दिला आहे. दरम्यान 'सुपर ३०' चित्रपट १२ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:

ent 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.