मुंबई - आयुष्यमान खुराणाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. २०१९ साल त्याला यशाच्या शीखरावर घेऊन गेलंय. यावर्षी त्याचे सलग ७ चित्रपट हिट ठरलेत. अशी भन्नाट कामगिरी करणारा आजच्या काळातील तो एकमेव अभिनेता आहे. विशेष म्हणजे त्याचे पुढील वर्षही भन्नाट जाणार आहे.
आयुष्यमानकडे स्क्रिप्ट येण्याचा सिलसिला जारी आहे. बऱ्याच स्क्रिप्ट त्याला आवडल्या आहेत. २०२० मध्ये या सिनेमांचे काम सुरू होईल. सध्या मात्र तो सुट्टीचा आनंद घेत आहे.
अलिकडेच त्याने सांगितलंय की, त्याला एक स्क्रिप्ट आवडली असून यात त्याची गुप्तहेराची भूमिका आहे. ही सत्यकथा असल्याचे समजते. या कथेवर काम सुरू करण्यासाठी त्याला भरपूर मेहनत करावी लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला जीममध्ये भरपूर घाम गाळावा लागणार आहे. यासाठी आपल्या हातात चारच महिने असल्याचे त्याने सांगितलंय. हा सिनेमा करण्यासाठी उत्सुक असल्याचे त्याने म्हटलंय.
आयुष्यमानने २०१९ मध्ये आर्टिकल 15 , ड्रीम गर्ल आणि बालासारख्या हिट चित्रपट दिलेत. तो आगामी 'गुलाबो सीताबो' आणि 'शुभ मंगल ज्यादा सावधान' लवकरच झळकणार आहे.