मुंबई - 'आर्टिकल १५' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आयुष्मान आता 'गुलाबो सिताबो' चित्रपटात झळकणार आहे. नुकतंच त्यानं या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं, सेटवरील फोटो शेअर करत त्यानं स्वतःच याबद्दलची माहिती दिली होती. आता या शूटींगनंतर तब्बल ३ महिन्यांनी आयुष्मान आपल्या पत्नीला म्हणजेच ताहिराला भेटला आहे.
आयुष्मानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ताहिराचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये ताहिरा आपल्या बॅगमध्ये काहीतरी शोधताना दिसत आहे. यालाच कॅप्शन देत, ती काय शोधत आहे, माहिती नाही. कदाचित घराची चावी सापडत नव्हती. किंवा मग मी हरवलो होतो, मागच्या काही महिन्यांपासून, असं आयुष्माननं म्हटलं आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
तीन महिन्यांनंतर पुन्हा एकदा तिच्यासोबत असल्याचं आयुष्मानने सांगितलं आहे. दरम्यान 'गुलाबो सिताबो' चित्रपटात तो अमिताभ यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सुजित सरकार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून चित्रपट २०२० मध्ये २४ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.