मुंबई - बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि जितेंद्र कुमार दोघेही सध्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटात दिसणार आहेत. दोघेही समलैंगिक व्यक्तीची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये आयुष्मान आणि जितेंद्रचा लिपलॉक किस पाहायला मिळाला. मात्र, खऱ्या आयुष्यातही त्यांनी दुसऱ्या मुलाला किस केलं असल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
सध्या आयुष्मान आणि जितेंद्र कुमार दोघेही 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. प्रमोशन दरम्यान त्यांनी काही भन्नाट किस्से उलगडले. आयुष्मान जितेंद्रला प्रश्न विचारतो, की 'तू चित्रपटात मला किस करण्यापूर्वी कोणत्या मुलाला किस केले होते का?' याचे उत्तर देताना जितेंद्र म्हणतो. होय. 'इंजिनियरिंग कॉलेजमध्ये रॅगिंग दरम्यान मला चार मुलांना किस करण्यास सांगितले होते. तेव्हा मी मुलांना किस केलं होतं'.
हेही वाचा -रणवीरच्या 'जयेशभाई जोरदार'चे शूटिंग पूर्ण, शेअर केला फोटो
त्यानंतर जितेंद्रनेही आयुष्मानला हाच प्रश्न विचारला. तेव्हा आयुष्मान देखील सांगतो. की मी सुद्धा 'रोडीज' कार्यक्रमात असताना मला एक टास्क देण्यात आले होते. ट्रुथ आणि डेअर खेळत असताना मी डेअर निवडले होते. त्यामुळे मला मुलाला किस करण्याचा टास्क देण्यात आला होता.
चित्रपटाबाबत सांगायचं तर, 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटाचे दिग्दर्शन हितेश कैवल्य यांनी केले आहे. समलैंगिक व्यक्तींची प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. २१ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -खऱ्या आयुष्यात विकीला 'या' गोष्टींची वाटते भीती, पाहा 'भूत'चा मेकिंग व्हिडिओ