कोलकाता - भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू झूलन गोस्वामी हिच्या जीवनावर आधारित चित्रपट बनणार आहे. यात झुलनची मुख्य भूमिका अनुष्का शर्मा साकारणार आहे. यासाठी अनुष्का कोलकात्याला पोहोचली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सामन्याच्या सीक्वेन्सचे शूटींग कोलकात्याकत पार पडणार आहे. यासाठी अनुष्का ईडन गार्डन स्टेडियमवर पोहोचली आहे. या शूटींगनंतर ती कोलकाता सोडणार आहे. झूलनच्या या भूमिकेसाठी वाणी कपूर ही दिग्दर्शक सुशांत घोष यांची पहिली पसंत होती. या भूमिकेसाठी प्रियंका चोप्राशीही संपर्क करण्यात आला होता. मात्र निर्मात्यांना अनुष्कानेच ही भूमिका करावी असे वाटत होते.
झूलन गोस्वामीने २०१८ मध्ये टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यातून संन्यास घेतला होता. भारतीय महिला क्रिकेटची ती दिग्गज खेळाडू मानली जाते. २०१८ मध्ये २०० विकेट घेणारी ती पहिली महिला क्रिकेटर बनली होती. विशेष म्हणजे अनुष्काचा पती विराट कोहली हा भारतीय संघाचा कप्तान आणि स्टार खेळाडू आहे. त्यामुळे झूलनच्या भूमिकेत अनुष्का पडद्यावर कशी दिसते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.