मुंबई - अभिनेता आशुतोष राणाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने गेल्या आठवड्यातच कोरोनाची लस घेतली होती. मंगळवारी आपल्या फेसबुकवर पोस्ट लिहून आशुतोषने ही माहिती दिली आहे. स्वतः कोरोनाबाधीत झाल्यानंतर आशुतोषने घरातील इतर सदस्यांची चाचणी घेतली आहे आणि त्यांचे अहवाल उद्या येतील, असे त्याने म्हटलंय.
आशुतोष राणा आणि त्यांची पत्नी, अभिनेत्री रेणुका शहाणे यांना ६ एप्रिलला कोविड -१९ ची लस पहिल्यांदा मिळाली. रेणुका शहाणे यांनी लसीकरण केंद्रावरुन स्वत: चा एक फोटो शेअर केला होता आणि ट्विट केले होते: "कोविड लसीकरण केंद्रातील सर्व डॉक्टर आणि परिचारिकांचे विशेष आभार. आज आम्ही लसीकरणाचा पहिला डोस घेतला. लस मिळवा आणि मास्क घाला, सामाजिक अंतर ठेवा आणि आपले हात स्वच्छ ठेवा. "
-
BKC कोविड लसीकरण केंद्राच्या उत्तम सेवेसाठी @mybmc @CMOMaharashtra @PMOIndia व कोविड लसीकरण केंद्राच्या सर्व वैद्यकीय चिकित्सकांचे, परिचारिकांचे विशेष आभार 🙏🏽 आज आम्ही लसिकरणाचा पहिला डोस घेतला. लसीकरण करून घ्या व आवर्जून मास्क लावा, सामाजिक अंतर ठेवा व हात सॅनिटाईझ करत रहा 🙏🏽🙏🏽 pic.twitter.com/TGHyAN7Kd7
— Renuka Shahane (@renukash) April 6, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">BKC कोविड लसीकरण केंद्राच्या उत्तम सेवेसाठी @mybmc @CMOMaharashtra @PMOIndia व कोविड लसीकरण केंद्राच्या सर्व वैद्यकीय चिकित्सकांचे, परिचारिकांचे विशेष आभार 🙏🏽 आज आम्ही लसिकरणाचा पहिला डोस घेतला. लसीकरण करून घ्या व आवर्जून मास्क लावा, सामाजिक अंतर ठेवा व हात सॅनिटाईझ करत रहा 🙏🏽🙏🏽 pic.twitter.com/TGHyAN7Kd7
— Renuka Shahane (@renukash) April 6, 2021BKC कोविड लसीकरण केंद्राच्या उत्तम सेवेसाठी @mybmc @CMOMaharashtra @PMOIndia व कोविड लसीकरण केंद्राच्या सर्व वैद्यकीय चिकित्सकांचे, परिचारिकांचे विशेष आभार 🙏🏽 आज आम्ही लसिकरणाचा पहिला डोस घेतला. लसीकरण करून घ्या व आवर्जून मास्क लावा, सामाजिक अंतर ठेवा व हात सॅनिटाईझ करत रहा 🙏🏽🙏🏽 pic.twitter.com/TGHyAN7Kd7
— Renuka Shahane (@renukash) April 6, 2021
आशुतोष राणा यांनी गेल्या एका आठवड्यात त्याच्या संपर्कात जे लोक आले होते त्या सर्वांना कोविड १९ ची चाचणी घेण्याची विनंती केली आहे.
यापूर्वी अभिनेता परेश रावल यांनाही लसीकरणानंतर आठवड्याभरातच कोरोना विषाणूची लागण झाली होती. अलिकडच्या काळात कॅटरिना कैफ, विक्की कौशल, अक्षय कुमार, भूमी पेडणेकर यासारख्या सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती. अक्षय कपूर, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे आता बरे झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतातील कोरोव्हायरस संसर्गाची नवीन प्रकरणे १,८०,०००च्या वर नोंदवली गेली आहेत. एकूण कोविड -१९ची संख्या १,३८,७३,८२५ इतकी आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वात जास्त नुकसानग्रस्त राज्य असल्याने महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी १५ दिवसांचे कडक निर्बंध लागू केले आहेत.
हेही वाचा - टकाटक’ च्या सिक्वेलच्या शूटिंगला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर झाली सुरूवात!