मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख, वहीदा रहमान आणि हेलन या तिघीजणी सुट्टीचा आनंद घेत आहेत. अंदमान आणि निकोबार बेटावर आनंद घेत असतानाचा एक फोटोसध्या खूप चर्चेत आला आहे.

निर्माता तनुज गर्ग यांनी तिघीजणी सुट्टीचा आनंद घेत असतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. सोमवारी तनुजने आशा पारेख, वहीदा रहमान आणि हेलन यांचेकाही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

"जर दिल चाहता है हा चित्रपट पुन्हा बनवायचा असेल तर या तिघींसोबत शक्य आहे. वहिदा रहमान, आशा पारेख आणि हेलन या निवृत्तीचा आनंद अंदमान आणि निकोबार बेटावर घेत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहात आहे,'' अशा अर्थाची पोस्ट तनुजने लिहिली आहे.

यापूर्वी अंदमान आणि निकोबार बेटांवर स्नॉर्कलिंग गिअर घालून वहिदा रेहमानने अंडर वॉटर फोटोग्राफी करुन दाखवून दिले होते की वय हे फक्त आकडे आहेत.
हेही वाचा - राजधानी दिल्लीत सर्व सुविधायुक्त १०० खाटांचे रुग्णालय बांधतेय हुमा कुरेशी!