ETV Bharat / sitara

मुंबई पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर, राज कुंद्राच्या वतीने हायकोर्टात याचिका

author img

By

Published : Jul 29, 2021, 6:12 PM IST

पॉर्नोग्राफी प्रकरणामध्ये राज कुंद्रा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा याचिकेत आरोप करण्यात आला होता. याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यापुढे सुनावणी करण्यात आली.

Arrest made by Mumbai Police is illegal,
राज कुंद्राच्या वतीने हायकोर्टात याचिका

मुंबई - पॉर्नोग्राफी प्रकरणामध्ये राज कुंद्रा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा याचिकेत आरोप करण्यात आला होता. याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यापुढे सुनावणी करण्यात आली. या याचिकेमध्ये तपासात सहकार्य करूनही पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक केल्याचा दावा करण्यात आला आहे.

41(a) वर सही करण्यास नकार दिल्यानं सहकार्य करत नसल्याचा मुंबई पोलिसांकडून ठपका ठेवण्यात आला आहे. मुळात आरोपपत्र दाखल झालेलं असताना पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस देणं आणि कोर्टाला कळवणं अपेक्षित होतं, असेही या याचिकेत म्हटलंय. कोरोना काळात गरज नसताना उगाच आरोपींना अटक करून जेलमधील गर्दी वाढवू नका असा युक्तीवाद करण्यात आला. तसेच कोरोनाकाळात आरोपींच्या अटेकबद्दल निर्देश स्पष्ट असतानाही मुंबई पोलिसांनी ही कारवाई केल्याचा दावा यावेळी करण्यात आला. पोलिसांना केवळ कारवाई केल्याचा दिखावा करायचा आहे असाही आरोप उच्च न्यायालयात राज कुंद्रा च्यावतीनं करण्यात आला.

राज कुंद्राचे वकील आभात पोंडा यांचा युक्तीवाद

सीआरपीसी 41(a) नोटीस मी स्वीकारला नाही, म्हणून मला अटक करण्यात आली. पण हीच नोटीस स्वीकारलेल्या माझ्या सहका-यालाही पोलिसांनी अटक केली आहे. मुळात ही नोटीस सांगते की आरोपीला 2 आठवड्यांचा अवधी द्यायला हवा, मात्र इथं तो दिलाच नाही कारण मुंबई पोलिसांना केवळ दिखावा करायचा आहे असा युक्तीवाद अॅडव्होकेट पोंडा यांनी केला.

हायकोर्ट किमान या गोष्टींची पडताळणी करीत आहे. मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टानं आमचं ऐकूनच घेतलं नाही व 'आरोपीला थेट रिमांड मंजूर केली, याच विरोधात आम्ही दाद मागत आहोत, असे सांगत राज कुंद्राचे वकील आभात पोंडा यांनी आपला युक्तीवाद संपवला.

हेही वाचा - पर्यावरण, राजकारण आणि बरच काही ..... पाहा अभिनेता अतुल कुलकर्णी सोबत केलेली खास बातचीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.