ETV Bharat / sitara

B'day Spl: १८ वर्षाच्या वयात सलमानची बहीण अर्पिताला डेट करत होता अर्जुन - ishqzade

अर्जुन अवघ्या १८ वर्षांच्या वयात रिलेशनशिपमध्ये होता. सलमान खानची बहीण अर्पिता खान हिला तो डेट करत होता. सलमान आणि अर्जुनमध्ये चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते.

अर्पिताला डेट करत होता अर्जुन
author img

By

Published : Jun 26, 2019, 8:00 AM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकिड्सनं आतापर्यंत आपलं नशीब आजमावलं आहे. यातीलच एक नाव म्हणजे अर्जुन कपूर. बोनी कपूर यांचा मुलगा असलेल्या अर्जुनने 'इश्कजादे' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याच्या या पहिल्याच चित्रटाला प्रेक्षकांची उत्तम पसंती मिळाली. आज अर्जुनचा वाढदिवस आहे. याचनिमित्ताने जाणून घेऊया, त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी

ही गोष्ट फारच कमी जणांना माहित आहे, की अर्जुन अवघ्या १८ वर्षांच्या वयात रिलेशनशिपमध्ये होता. सलमान खानची बहीण अर्पिता खान हिला तो डेट करत होता. मात्र, नंतर दोन वर्षातच त्यांचं ब्रेकअप झालं आणि ही जोडी विभक्त झाली. तरीही सलमान आणि अर्जुनमध्ये चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते. मात्र, नंतर सलमानचा भाऊ अरबाज खान याची पत्नी मलायकाला अर्जुन डेट करायला लागला. या दोघांच्या नात्याविषयीच्या बातम्या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत आणि याच कारणामुळे सलमान आणि अर्जुनच्या नात्यात दुरावा आला.

अर्जुनच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले, तर 'इश्कजादे'नंतर अर्जुनने 'गुंडे' चित्रपटात भूमिका साकारली. यात त्याने रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रासोबत स्क्रीन शेअर केली. तर चेतन भगत यांच्या कादंबरीवर आधारित ‘२ स्टेट्स’ या चित्रपटातील अर्जुनची भूमिकाही त्याच्या चाहत्यांना चांगलीच भावली. अर्जुन लवकरच 'पानिपत' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आशुतोष गोवारिकर यांचं दिग्दर्शन असणाऱ्या या चित्रपटातून पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर भाष्य करण्यात येणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.