ETV Bharat / sitara

अर्जुन रामपाल-गॅब्रियेलाच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन - affair

अर्जुन रामपाल बाबा झाला असून गॅब्रियेलाने मुलाला जन्म दिला आहे. काही दिवसांपूर्वीच अर्जुनने गॅब्रियेलासोबतचा एक फोटो शेअर करून ते त्यांच्या बाळाच्या आगमनासाठी सज्ज असल्याचे सांगितले होते.

अर्जुन रामपाल-गॅब्रियेलाच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन
author img

By

Published : Jul 18, 2019, 9:54 PM IST

मुंबई - अभिनेता अर्जुन रामपाल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपासून तो गॅब्रियेला डिमेट्रीयाडीस हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तेव्हापासून त्यांच्या नात्याच्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अशात आता अर्जुन रामपाल आणि गॅब्रियेलाच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन रामपाल बाबा झाला असून गॅब्रियेलाने मुलाला जन्म दिला आहे. काही दिवसांपूर्वीच अर्जुनने गॅब्रियेलासोबतचा एक फोटो शेअर करून ते त्यांच्या बाळाच्या आगमनासाठी सज्ज असल्याचे सांगितले होते. यानंतर गॅब्रियेलाच्या बेबी शॉवरचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.

दरम्यान पूर्वपत्नी मेहर जेसिया आणि अर्जुन वीस वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकले होते. गेल्या काही वर्षांपासून दोघांमधील मतभेद वाढू लागल्याने अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र, अद्याप दोघांचा कायदेशीर घटस्फोट झालेला नाही. तर यानंतर एका कॉमन मित्राच्या माध्यमातून अर्जुन आणि गॅब्रियेला एकमेकांना भेटले होते.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.