ETV Bharat / sitara

ऐकावं ते नवलंच : 'या' राज्यात रात्रंदिवस चालणार 'साहो'चे शो - round-the-clock-screening-of-saaho

साहो या चित्रपटाचे स्क्रिनिंग रात्रभर करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने खास परवानगी दिली आहे. ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान हे शो रात्रंदिवस चालतील.

साहो चित्रपटाचे स्क्रिनिंग
author img

By

Published : Aug 30, 2019, 1:49 PM IST

मुंबई - 'साहो' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा रिलीज दिवस अखेर उजाडला आहे. अनेक भाषांमध्ये रिलीज झालेला हा सिनेमा अनेक विक्रम प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. यापैकी एक विक्रम तर आंध्र प्रदेश सुरू झाला आहे. ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या एक आठवड्यात 'साहो'चे रात्रंदिवस शो चालणार आहेत.

'बाहुबली'मुळे देशभर परिचित झालेल्या प्रभासचा उदय तेलुगु फिल्म इंडस्ट्रीमध्ये २००२ मध्येच झाला होता. 'ईश्वर' या चित्रपटातून त्याने पदार्पण केले आणि त्याच्या नावामागे वलय निर्माण होत गेले. आजवर त्याचे १९ चित्रपट हिट झाले आहेत. 'रिबेल स्टार' अशी ओळख असलेला प्रभास तेलुगु इंडस्ट्रीतील 'बाहुबली' अभिनेता बनलाय. त्याचे मुळ गांव आंध्र प्रदेशमध्ये असल्यामुळे या राज्याने 'साहो'साठी शोच्या वेळात खास सवलत जाहीर केली आहे.

प्रभासच्या चाहत्यांनी आंध्र सरकारकडे 'साहो'चे शो रात्रीही चालू ठेवण्याची विनंती केली. यावर सरकारने सकारात्मक विचार करीत त्याला संमत्ती दिली आहे. त्यामुळे रात्री १२ नंतर 'साहो'चे शो सुरू राहतील व हे खास शो रात्रंदिवस चालतील.

ट्रेड अॅनालिस्ट अतुल मोहन यांनी ही माहिती ट्विट करुन दिली आहे. प्रभासच्या चाहत्यांनी आंध्र प्रदेश सरकारकडे याबाबत खास मागणी केली होती. त्यानुसार सरकारने परवानगी दिली असून आंध्र प्रदेशमध्ये ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान रात्रंदिवस स्क्रिनिंग सुरू राहील. स्पेशल शो पहाटे १ ते सकाळी १० वाजेपर्यंत सुरू राहतील, असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

आंध्र प्रदेश सरकारने रात्रंदिवस शो सुरू ठेवण्याचा घेतलेला हा निर्णय 'साहो' चित्रपटाच्या निर्मात्यांसाठी खास अभिमानास्पद ठरला आहे. भारतात ही घटना दुर्मिळ आहे. या वर्षातील सर्वात बिगेस्ट ओपनिंग असलेला हा चित्रपट असल्यामुळे रात्रंदिवस स्क्रिनिंगसाठी 'साहो' पात्र ठरला आहे.

'साहो' चित्रपटात प्रभास शिवाय श्रध्दा कपूर, जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर, अरुण विजय, मुरली शर्मा असे दिग्गज कलाकार आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.