मुंबई - नुकतीच 'आई' बनलेली बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत असते. मध्यंतरीच्या काळात गरोदर असतानाही ती आपली निर्मितीसंस्था ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ मधील कारभारावर लक्ष ठेऊन होती. खरेतर ही निर्मितीसंस्था तिने आपला भाऊ कर्णेश शर्मासोबत सुरू केली. मात्र, सर्व काम ती भावावर न सोडता स्वत:ही करत असते. कोरोना उद्रेकामुळे ‘आरोग्य’ प्रकाशझोतात आले. अनुष्का नेहमीच स्वतःच्या व कुटुंबीयांच्या आरोग्याबाबत जागरूक असते. लॉकडाउन काळात तिने एक पाऊल पुढे टाकत तिच्या फिल्म सेटवरील ‘आरोग्य’ चांगले असावे याबद्दल आग्रह धरला.
![मुलीसोबत अनुष्का आणि विराट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-anushka-sharma-waste-segregation-mhc10001_06022021204034_0602f_1612624234_573.jpeg)
कुठल्याही चित्रपटाच्या सेटवर शेकडो माणसे काम करत असतात. त्यामुळे आजूबाजूला कचरा जमा होत असतो. याच कचऱ्याचे सेटवरच सुका-ओला-रिसायकल अशा पद्धतीत वर्गीकरण केले तर पर्यावरणाची काळजी घेतली जाईल. शिवाय, या विलग्नतेमुळे सार्वजनिक ठिकाणी आरोग्याच्या समस्या दूर ठेवण्यात मदत होते. ‘फिल्म शूटच्या वेळी कचरा विलग्न करणे सर्वांचेच जग बदलू शकते’ असे अनुष्का शर्मा म्हणाली आहे. शिवाय, असा उपक्रम राबवणारी ती पहिली निर्माती ठरली. नुकतेच मातृत्व प्राप्त झालेली अनुष्का फिल्म इंडस्ट्रीचे कामकाज अधिक चांगले करण्यासाठी सकारात्मक दृष्टीने पाहत आहे.
अनुष्का म्हणाली, “फिल्म शूटच्या वेळी कचरा विलग्न केल्याने आरोग्य-जग बदलू शकते आणि मला आनंद आहे की, आम्ही आमच्या निर्मिती उपक्रमाच्या सेटवर हे अंमलात आणू शकलो. पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज असून या कार्यात आपला फिल्म उद्योग मोठ्या प्रमाणात हातभार लावू शकतो आणि त्याबाबत पुरेशी जागरूकताही वाढवू शकतो. कचरा वेगळा होण्याची गरज काही काळापूर्वी लक्षात आली होती आणि आम्ही साथीच्या रोगाने पछाडलेले असताना हे करू शकलो याचा मला आनंद आहे.”
स्क्रॅप वेस्ट मॅनेजमेंट सोल्यूशन्सच्या संस्थापक, दिव्या रवीचंद्रन यांनी पुष्टी केली, ''चित्रपटाच्या शूटवरील कचरा व्यवस्थापन ही काळाची गरज आहे आणि अनुष्का शर्मा आणि कर्णेश शर्मा यांनी आमच्याबरोबर सक्रियपणे काम केल्याबद्दल त्यांना श्रेय द्यावे लागेल. क्लीन स्लेट फिल्मझने जागरूक चित्रपट निर्माते म्हणून पर्यावरणाला प्राधान्य दिला आहे ही चांगली सुरुवात आहे. खरोखरच इतरांनी अनुसरण केले पाहिजे. फिल्म उद्योगात याबाबत जागरूकता निर्माण झालीय. यानंतर इतर अनेक प्रॉडक्शन हाऊसेसनी ‘कचरा विलग्नन’ साठी आमच्याकडे संपर्क साधला असून पर्यावरणाचे रक्षण करण्याबद्दल लोक अधिक जागरूक होत आहेत हा बदल खरोखर स्वागतार्ह आहे.'' अनुष्का आणि विराटने त्यांच्या मुलीचे नाव वामिका असे ठेवले आहे.