नवी दिल्ली - माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दुबई भेटीच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी दुबई एक्स्पोच्या इंडिया पॅव्हेलियनमध्ये 'भारतीय मीडिया आणि मनोरंजन उद्योगाची ग्लोबल रीच' या विषयावर अभिनेता रणवीर सिंग याच्यासोबत संवाद साधला. ठाकूर म्हणाले की, दुबईत राहणारे भारतीय हे भारताचे खरे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. ते म्हणाले की या एक्सपोमधील भारताचा मंडप 17 लाख अभ्यागतांसह प्रचंड गर्दी खेचणारा ठरला आहे. देश भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असून, केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही उत्सव साजरा होत असल्याचे मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले. त्यानंतर ठाकूर यांनी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगसोबत 'मल्हारी' गाण्यावर डान्सही केला.भारताच्या सॉफ्ट पॉवर प्रोजेक्शनमध्ये चित्रपटांच्या योगदानाची कबुली देताना, ठाकूर म्हणाले की भारत ही कथाकथनाची भूमी आहे आणि भारतीय चित्रपट उद्योगाने परदेशातील लोकांवर मोठा प्रभाव पाडला आहे.
-
The power of Bollywood transcends barriers!
— BJYM Rinku (@bjym_rinku1) March 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Union Minister Anurag Thakur with Ranveer Singh at India Expo 2020 #DubaiExpo2020. pic.twitter.com/eSZtdhQeVW
">The power of Bollywood transcends barriers!
— BJYM Rinku (@bjym_rinku1) March 28, 2022
Union Minister Anurag Thakur with Ranveer Singh at India Expo 2020 #DubaiExpo2020. pic.twitter.com/eSZtdhQeVWThe power of Bollywood transcends barriers!
— BJYM Rinku (@bjym_rinku1) March 28, 2022
Union Minister Anurag Thakur with Ranveer Singh at India Expo 2020 #DubaiExpo2020. pic.twitter.com/eSZtdhQeVW
भारतीय कंटेंट जागतिक स्तरावर आपली उपस्थिती दाखवण्याच्या मार्गावर आहे, हे सांगताना रणवीर सिंग म्हणाला, “भारतीय मनोरंजन जागतिक स्तरावर स्फोट करणार आहे. आमच्या कथा लोकांशी भिडतात, सांस्कृतिक सीमा ओलांडतात आणि परदेशातील भारतीयांना चित्रपटांद्वारे भारताशी जोडतात.'' संभाषणादरम्यान रणवीर सिंग नुकत्याच प्रदर्शित झालेल्या RRR चित्रपटाबद्दल म्हणाला, 'उदाहरणार्थ RRR पहा, तो एकटाच सर्व बॉलिवूड चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर विभागत आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे'.
आदल्या दिवशी, ठाकूर यांनी दुबईने पर्यटन क्षेत्रासंदर्भात अवलंबलेल्या विविध धोरणांबद्दल दुबई कॉर्पोरेशन फॉर टुरिझम अँड कॉमर्स मार्केटिंगचे सीईओ इसाम काझीम यांच्याशी चर्चा केली. बैठकीदरम्यान, त्यांनी या एक्स्पोचे आयोजन केल्याबद्दल दुबईचे कौतुक केले, जे कोरोना काळ असूनही खूप यशस्वी झाले आहे. काझिम यांनी भारतामध्ये पर्यटनासाठी प्रचंड क्षमता असल्याचे अधोरेखित केले. ते म्हणाले की भारत प्रमुख शहरे आणि राज्यांच्या अद्वितीय पैलूंचा वापर करू शकतो आणि त्यांच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करू शकतो. याशिवाय, भारतातील आयटी टॅलेंटचा जागतिक उद्योगाला फायदा होतो, ज्याला एक ताकद म्हणून प्रोत्साहन दिले जाऊ शकते, असेही ते म्हणाले. मंत्री अनुराग ठाकूर यांनी काझिम यांना पर्यटन, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील सहकार्याच्या आणखी संधींवर चर्चा करण्यासाठी भारतभेटीचे निमंत्रण दिले.
हेही वाचा - ऑस्कर २०२२ मध्ये स्मिथने रॉकला मारलेल्या थप्पडीवर कंगना रणौतची प्रतिक्रिया