ETV Bharat / sitara

अनुपम खेर यांचा कंगनाला पाठिंबा, म्हणाले... - अनुपम खेर

कंगनाच्या पाली हिल येथील "मणिकर्णिका" कार्यालयात बेकायदेशीर बांधकाम केल्याचे समोर आल्यानंतर आज महापालिकेने ते पाडण्याची कारवाई केली. पालिकेच्या या कारवाईला अभिनेते अनुपम खेर यांनी चुकीचे म्हटलं असून कंगनाला पाठिंबा दर्शवला आहे.

कंगना-अनुपम खेर
कंगना-अनुपम खेर
author img

By

Published : Sep 9, 2020, 6:05 PM IST

Updated : Sep 9, 2020, 7:54 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या मुंबईसंदर्भात केलेल्या बेताल वक्तव्याचा अनेकांनी विरोध केला आहे. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधल्यानंतर शिवसेना विरुद्ध कंगना असे चित्र सध्या तयार झाले आहे. कंगनाच्या पाली हिल येथील "मणिकर्णिका" कार्यालयात बेकायदेशीर बांधकाम केल्याचे समोर आल्यानंतर आज महापालिकेने ते पाडण्याची कारवाई केली. पालिकेच्या या कारवाईला अभिनेते अनुपम खेर यांनी चुकीचे म्हटलं असून कंगनाला पाठिंबा दर्शवला आहे.

  • ग़लत ग़लत ग़लत है !! इसको bulldozer नही #Bullydozer कहते है। किसी का घरोंदा इस बेरहमी से तोड़ना बिल्कुल ग़लत है। इसका सबसे बड़ा प्रभाव या प्रहार @KanganaTeam के घर पर नहीं बल्कि मुम्बई की ज़मीन और ज़मीर पर हुआ है। अफ़सोस अफ़सोस अफ़सोस है। ☹️

    — Anupam Kher (@AnupamPKher) September 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'हे चुकीचे आहे. याला bulldozer नाही तर #Bullydozer म्हणतात. कुणाचेही घर इतक्या क्रूरतेनं तोडणं चुकीचं आहे. याचा सर्वांत जास्त प्रभाव कंगनावर नाही, तर मुंबईच्या जमिनीवर आणि आत्मसन्मानावर झाला आहे. खेदजनक, असे टि्वट अनुमप खेर यांनी केले आहे.

महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईच्या विरोधात कंगनाच्या वकिलाकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली. त्यावर महानगरपालिकेने आपली कारवाई थांबवावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यासंदर्भात उत्तर देण्यासाठी पालिकेला गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ दिली आहे.

Last Updated : Sep 9, 2020, 7:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.