ETV Bharat / sitara

सुशांतला क्लॉस्ट्रोफोबिया होता हा रियाचा दावा अंकिता लोखंडेने फेटाळला - Sushant Singh Rajput

रिया चक्रवर्तीने एका मुलाखतीत सुशांत क्लॉस्ट्रोफोबियाने ग्रस्त होता असे म्हटले होते. रियाचा हा दावा अंकिता लोखंडेने फेटाळून लावला आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून यात तो बोईंग 737 फिक्स्ड बेस फ्लाइट सिम्युलेटर उडवताना दिसू शकतो.

Sushant Singh Rajput
सुशांतसिंग राजपूत
author img

By

Published : Aug 27, 2020, 7:31 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूत हा क्लॉस्ट्रोफोबियाने ग्रस्त होता असे रिया चक्रवर्तीने म्हटले होते. तिचा हा दावा सुशांतची माजी गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने फेटाळून लावला आहे.

अंकिताने ट्विटरवर एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सुशांत हा बोईंग 737 फिक्स्ड बेस फ्लाइट सिम्युलेटर उडवताना दिसू शकतो. सुशांतने हे 2018 मध्ये खरेदी केले होते.

व्हिडिओ शेअर करताना अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिले की, "हा हॅशटॅग्लॉस्ट्रोफोबिया आहे का? तुला नेहमीच हे उडवायचे होते आणि तू ते केलंस, याचा आम्हाला सर्वांना तुझा अभिमान आहे."

सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिने केलेल्या दाव्याला अंकिताच्या पोस्टमुळे मोठा धक्का बसला जाऊ शकतो. रियाने एका मुलाखतीत असे म्हटले आहे की, गेल्या वर्षी युरोपच्या प्रवासात तिला सुशांतच्या क्लॉस्ट्रोफोबियाची माहिती मिळाली होती आणि त्याच्यावर मात करण्यासाठी तो मोडाफिनिलचा वापर करत होता.

ऑगस्ट 2018 मध्ये सुशांतने बोईंग 737 फिक्स्ड बेस फ्लाइट सिम्युलेटर खरेदी केले, जे पायलटांना प्रशिक्षित करण्यासाठी वापरले जाते. सुशांत त्याने विकत घेतलेल्या विमानाबद्दल अत्यंत उत्साही होता आणि एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्याचा उल्लेखही केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.