मुंबई - अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि कृती सेनॉन यांनी गुरुवारी सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. या संदर्भात अंकिताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ संदेश शेअर केला, तर कृती सेनॉन हिने यासंदर्भात सीबीआय चौकशीची मागणी करणारे एक निवेदन शेअर केले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
"सुशांतसिंह राजपूतचे काय झाले हे राष्ट्राला जाणून घ्यायचे आहे. सुशांतला न्याय मिळाला पाहिजे. सुशांत प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी. ," असे अंकिता लोखंडेने व्हिडिओ संदेशात म्हटले आहे.
हेही वाचा - पाटणातील एफआयआरला 'झिरो एफआयआर' म्हणून मुंबईला हस्तांतरित करावे - रिया चक्रवर्ती
दुसरीकडे, कृतीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, या प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी जेणेकरुन कोणत्याही राजकीय अजेंडाशिवाय त्याची चौकशी व्हावी.

"मी आशा आणि अशी विनंती करते की सीबीआयने हे प्रकरण ताब्यात घ्यावे जेणेकरून कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी कोणत्याही राजकीय अजेंडाविना चौकशी केली गेली पाहिजे. आता त्याचा आत्मा शांततेत विश्रांती घेत आहे. मी प्रार्थना करते की सत्य लवकरच समोर येईल .." असे तिने पुढे लिहिले आहे.
आदल्या दिवशी अभिनेत्री कंगना रनौतनेही स्वत: चा व्हिडिओ संदेश शेअर करुन या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
राजपूत 14 जून रोजी त्याच्या मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी मृतावस्थेत आढळला होता.