मुंबई - कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून नागरिक योग्य ती खबरदारी घेताना दिसत आहेत. तसेच कलाकार देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना गर्दी टाळण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. अभिनेते अनिल कपूर आणि अनुपम खेर यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोघांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकमेकांशी दुरूनच संवाद साधला आहे.
अनुपम खेर यांनी आपल्या बाल्कनीमधूनच अनिल यांच्याशी मोबाईलवर संवाद साधला. ते अलिकडेच विदेशातून भारतात परतले आहेत. त्यामुळे अनिल कपूर यांच्याशी बोलताना ते म्हणतात, की तू माझ्या समोर आहेस तरीही आपण एकमेकांना भेटू शकत नाही. एकमेकांच्या घरी जाऊ शकत नाही'.
-
#AKseesAK!
— Anil Kapoor (@AnilKapoor) March 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Keeping up with traditions but from a distance!! #socialdistancing #staysafe@AnupamPKher pic.twitter.com/mqyX6vT9Io
">#AKseesAK!
— Anil Kapoor (@AnilKapoor) March 21, 2020
Keeping up with traditions but from a distance!! #socialdistancing #staysafe@AnupamPKher pic.twitter.com/mqyX6vT9Io#AKseesAK!
— Anil Kapoor (@AnilKapoor) March 21, 2020
Keeping up with traditions but from a distance!! #socialdistancing #staysafe@AnupamPKher pic.twitter.com/mqyX6vT9Io
हेही वाचा -कोरोनामुळे घाबरुन जाऊ नका, रोहित शेट्टीचे नागरिकांना आवाहन
त्यावर अनिल कपूर म्हणतात, 'आता काय करणार, सुनीता तुम्हाला घरात घेणार नाही', असे म्हणून ते लगेच गाणे गायला सुरुवात करतात. 'तेरे घर के सामने एक घर बनाऊंगा', असं गाणं गाऊन त्यांनी अनुपम यांच्याशी संवाद साधला.
-
My side of the #LoveStory with my next door neighbour and a great friend @AnilKapoor. Love sometimes is #SocialDistancing even from your loved ones🤓🌈 #LoveInTheTimesOfCorona #SelfIsolation #ResponsibleCitizens pic.twitter.com/qBuXMgxc1E
— Anupam Kher (@AnupamPKher) March 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">My side of the #LoveStory with my next door neighbour and a great friend @AnilKapoor. Love sometimes is #SocialDistancing even from your loved ones🤓🌈 #LoveInTheTimesOfCorona #SelfIsolation #ResponsibleCitizens pic.twitter.com/qBuXMgxc1E
— Anupam Kher (@AnupamPKher) March 21, 2020My side of the #LoveStory with my next door neighbour and a great friend @AnilKapoor. Love sometimes is #SocialDistancing even from your loved ones🤓🌈 #LoveInTheTimesOfCorona #SelfIsolation #ResponsibleCitizens pic.twitter.com/qBuXMgxc1E
— Anupam Kher (@AnupamPKher) March 21, 2020
दोघांनीही एकमेकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत नागरिकांना देखील सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा -'जनता कर्फ्यूला प्रतिसाद द्या', सलमान खानचे नागरिकांना आवाहन
आपल्या जवळच्या व्यक्तींपासूनही काही दिवस लांब राहा. काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना केले आहे.