ETV Bharat / sitara

इरफानचा बॉलिवूडमध्ये कमबॅक, 'अंग्रेजी मीडियम'च्या चित्रीकरणाला सुरूवात - cancer

इरफानने आपल्या 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरूवात केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सेटवरील काही फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे

अंग्रेजी मीडियामच्या चित्रीकरणाला सुरूवात
author img

By

Published : Apr 5, 2019, 11:18 AM IST

मुंबई - अभिनेता इरफान खान गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर होता. कॅन्सरवरील उपचारांसाठी त्याने कामातून काही वेळासाठी ब्रेक घेतला होता. अशात चाहते इरफानच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत असतानाच आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

इरफानने आपल्या 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरूवात केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सेटवरील काही फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. हा चित्रपट इरफानच्याच 'हिंदी मीडियम' चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. मात्र, चित्रपटाची कथा वेगळी असणार असल्याचे सांगितले जात आहे.

उदयपुरमध्ये सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून चित्रपटाचा काही भाग लंडनमध्येही शूट केला जाणार आहे. होमी अदाजानिया या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून दिनेश विजन यांची निर्मिती असणार आहे. त्यामुळे, लवकरच इरफानच्या चाहत्यांना त्याला पुन्हा एकदा चित्रपटात पाहण्याची संधी मिळणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.