मुंबई - अंधाधून या सिनेमाला भारतीय प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या थ्रिलर सिनेमानं प्रेक्षकांची मनं जिंकण्यासोबतच बॉक्स ऑफिसवरही तुफान कमाई केली. यासोबतच या सिनेमासाठी आयुष्मान खुराणाला यंदाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही जाहीर झाला. मात्र, अजूनही या सिनेमाची यशाकडील वाटचाल सुरुच आहे.
भारताशिवाय चीनमध्येही या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यानंतर आता हा चित्रपट दक्षिण कोरियामध्येही प्रदर्शित केला जाणार आहे. येत्या २८ ऑगस्टला याठिकाणी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
-
After a superb run in #China, #AndhaDhun to release in #SouthKorea on 28 Aug 2019 [over 90 screens]... Posters for the local market: pic.twitter.com/0Fkkz71BYB
— taran adarsh (@taran_adarsh) August 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">After a superb run in #China, #AndhaDhun to release in #SouthKorea on 28 Aug 2019 [over 90 screens]... Posters for the local market: pic.twitter.com/0Fkkz71BYB
— taran adarsh (@taran_adarsh) August 23, 2019After a superb run in #China, #AndhaDhun to release in #SouthKorea on 28 Aug 2019 [over 90 screens]... Posters for the local market: pic.twitter.com/0Fkkz71BYB
— taran adarsh (@taran_adarsh) August 23, 2019
दक्षिण कोरियामध्ये एकूण ९० स्क्रीनवर हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. लोकल प्रेक्षकांसाठीचे दोन पोस्टरही शेअर करण्यात आले आहेत. भारत आणि चीनपाठोपाठ आता येथील प्रेक्षकांची मनं जिंकण्यातही हा सिनेमा यशस्वी ठरणार का? हे पाहणं रंजक असणार आहे.