मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात ती फ्लोरल प्रिंट ड्रेसमध्ये दिसली आहे. एक्वा ब्लूच्या ओव्हरवर या गुलाबी फुलांचा प्रिंट ड्रेसमध्ये अनन्या खूपच सुंदर दिसत आहे. हे फोटो तिने फ्लॉवर इमोजीच्या कॅप्शनसह शेअर केले आहेत.
अभिनयाबद्दल बोलायचे तर अनन्याचा ‘खाली पीली’ हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता आणि सध्या ती शकुन बत्राच्या एका चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप गुलदस्त्यात आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी देखील आहेत.
हेही वाचा - अजय देवगणनंतर अक्षय कुमारनेही नाकारला सुहेलदेव?
याशिवाय अनन्या 'फाइटर' हा एक अॅक्शन चित्रपटदेखील करत आहे, यात ती विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे.
हेही वाचा - केरळमधील २१ वर्षांची आर्या राजेंद्रन भारतातील सर्वात तरुण महापौर