मुंबई - बॉलिवूडमध्ये सध्या अनेक स्टारकिड्स पदार्पण करताना दिसत आहेत. लवकरच चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेदेखील स्टूडंट ऑफ द ईअर चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे अनन्या आणि शाहरूखची मुलगी सुहाना खान या खास मैत्रिणी आहेत.
याच पार्श्वभूमीवर सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल अनन्याला प्रश्न विचारला असता, सुहाना एक खूप चांगली कलाकार असल्याचे अनन्याने म्हटले आहे. तिचे यूट्यूबर अनेक व्हिडिओदेखील उपलब्ध असून तुम्ही तिचा अभिनय पाहू शकता, असंही अनन्याने सांगितले.
मात्र, ती बॉलिवूडमध्ये पदार्पण कधी करणार याबद्दल काहीही कल्पना नसल्याचे तिने म्हटले आहे. तर सुहानाने लवकरच चित्रपटसृष्टीत डेब्यू करावा, अशी इच्छाही तिने यावेळी बोलून दाखवली आहे. मात्र, सुहानाच्या पदार्पणाविषयीची कोणतीही स्पष्ट माहिती अनन्याने दिली नाही.