ETV Bharat / sitara

सोशल मीडियावर सकारातमकता पसरविण्यासाठी अनन्या पांडेचे 'सोशल मीडिया फॉर सोशल गुड' कॅम्पेन!

अनन्या पांडे 'सो पॉजिटिव' उपक्रमाच्या अनुषंगाने 'सोशल मीडिया फॉर सोशल गुड' कॅम्पेनमधून संवाद साधत या बाबतचा प्रचार, प्रसार करणार आहे.

अनन्या पांडे
अनन्या पांडे
author img

By

Published : Jul 2, 2021, 10:15 AM IST

मुंबई -कोरोना काळातील लादल्या गेलेल्या लॉकडाऊन चे अनेक तोटे असले तरी काही फायदेसुद्धा आहेत. याच काळात सोशल मीडियावरील ‘ट्रॅफिक’ वाढला आणि लोकं मोठ्या संख्येने समाज माध्यमांचा वापर करू लागले. या माध्यमांवर टीकाटिपण्णी आणि ट्रोलिंग होतंच असते तरीही नकारात्मकतेला बाजूला सारून सकारात्मकता पसरविणारे देखील अनेक आहेत. तरुण अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियाचा उपयोग सामाजिक उपक्रमांसाठी करून पॉझिटिव्हिटी पसरविण्यासाठी करीत असते. दोन वर्षांपूर्वी अनन्या पांडेने आपल्या 'सो पॉजिटिव' उपक्रमाची सुरुवात केली होती, एक असा उपक्रम ज्याने साइबर-बुलिंग अथवा ट्रोलिंग आणि त्याच्या गंभीर परिणामांना अधोरेखित केले आणि तिने 'सोशल मीडिया फॉर सोशल गुड' हे कॅम्पेन सुरु केले आहे. या कॅम्पेनद्वारे सोशल मीडियावर सकारात्मक आणि निरोगी कसे राहता येईल यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

अनन्या पांडेने आपल्या सोशल मीडियावर शेयर केले की, " We often talk about the negative side of social media - the bullying, trolling and hatred. During the pandemic, I saw the power of people on social media- the humanity. Strangers helping strangers, sharing resources and information, saving lives. It reinforced my belief in kindness, compassion and empathy. ‘Social media for Social good’ is a series in which I’m going to be talking to some of the ‘Heroes’ of social media who have used it positively and constructively for the good of society! Social media can be a kinder place - let’s all do our part in making sure that happens! @sopositivedsr #SocialMediaForSocialGood ❤️🙌🏻 "

अनन्याने 'सो पॉजिटिव' उपक्रमाची सुरुवात सोशल मीडिया बुलिंगबाबत जागरूकता वाढवण्यासाठी केली होती. या युवा अभिनेत्रीद्वारे सुरू करण्यात आलेल्या या नव्या अभियानाचा उद्देश समाजाच्या भल्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग करणे हा आहे. एक उपक्रम जो विचारोत्तेजक आहे, आपल्याला हा विचार पसरवायचा आहे की जेव्हा सोशल मीडियाचा रचनात्मक पद्धतीने उपयोग करण्यात येतो तेव्हा तो समाजातील प्रत्येकासाठी खूप काही चांगले करू शकतो. अनन्या पांडे सोशल मीडियाच्या त्या सर्व नायकांना सलाम करते आहे ज्यांनी याचा वापर सामाजिक कल्याणासाठी केला आहे.

अनन्या म्हणते की, "मी त्या सगळ्यांचे कौतुक करते, ज्यांनी समाजाच्या भल्यासाठी रचनात्मक पद्धतीने सोशल मीडियाचा उपयोग केला आहे. सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करून तुम्ही सगळ्यांनी या वैश्विक साथीच्या रोगासोबत लढण्यासाठी, परिस्थितितून बाहेर पडण्यासाठी आणि गरजू आणि ग्रस्त लोकांच्या प्रत्येक संभाव्य मदतीसाठी स्वतःला सशक्त बनवले आहे. लोकांनी हॉस्पिटल्समध्ये बेड, ऑक्सीजन सिलेंडर पुरवण्यासाठी मदद केली आहे. काही वॅक्सीनशी निगडित माहिती पुरवत होते तर काही भटक्या जनावरांच्या मदतीसाठी पुढे सरसावले होते, अशी ही न संपणारी यादी आहे. मी यातील काही सोशल मीडिया ‘हिरों’सोबत 'सो पॉजिटिव'च्या नव्या सीरीजमध्ये, #SocialMediaForSocialGood माध्यमातून संवाद साधणार आहे. सोशल मीडियातील या हीरोंच्या माध्यमातून समाजातील चांगुलपणा आणि इतरांच्या मदतीसाठी सकारात्मकपणे सोशल मीडियाचा उपयोग करण्याबाबत आणि त्याच्या व्यापक प्रभावावर चर्चा घडेल. या समाजाच्या भल्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग सुरू ठेवूयात. सोशल मीडियाला नेहमीच आशादायी, आरोग्यदायी आणि आनंदाची जागा बनवुयात. आशा आहे कि तुम्ही सगळे निरोगी आहात आणि आपली योग्य ती काळजी घेत आहात.”

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.