मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे मालदीवच्या सुट्टीवर आहे. तिच्या अनुयायांना सोशल मीडियावर जोडून ठेवण्यासाठी ती नेहमी आपले आकर्षक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करीत असते. मालदिवच्या निळ्याशार समुद्र किनाऱ्याची क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर अभिनेत्री अनन्या पांडेने आता पोहण्याच्या पोशाखात आकर्षक फोटो शेअर केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
शुक्रवारी अनन्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यात ती ब्लॅक बिकिनी टॉप परिधान केलेली दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने हॉट मेस असे लिहिले आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सिलेब्रिटीजनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात कनिका कपूर, डीन पांडे, महेप कपूर नीलम कोठारी यांचा समावेश आहे. तिचा कमेंट सेक्शनला हृदय आणि फायर इमोजींनी भरून गेला आहे.
कामाच्या पातळीवर अनन्या पांडे खूप बिझी अभिनेत्रींपैकी एक आहे. आगामी लायगर या चित्रपटामध्ये तेलुगु हार्टथ्रोब विजय देवरकोंडासमोर झळकणार आहे. तसेत ती शकुन बत्रा दिग्दर्शित आगामी सिनेमात दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत काम करीत आहे.
हेही वाचा - मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर डिनर डेटवर