ETV Bharat / sitara

'सुपर ३०'चे रिअल हिरो आनंद कुमारांची चित्रपटावर प्रतिक्रिया - सिनेमा करमुक्त

या माध्यमातून एक संदेश विद्यार्थ्यांपर्यंत जात आहे आणि जेव्हा लोक म्हणतात, की ते यातून प्रेरित होत आहेत. तेव्हा या चित्रपटाचा उद्देश साध्य झाल्याचं वाटत असल्याचं आनंद कुमार म्हणाले.

'सुपर ३०'चे रिअल हिरो आनंद कुमारांची चित्रपटावर प्रतिक्रिया
author img

By

Published : Jul 27, 2019, 12:39 PM IST

मुंबई - हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला 'सुपर ३०' चित्रपट काही आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झाला. गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला चित्रपट विश्लेषकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. तसेच हा सिनेमा प्रेक्षकांच्याही चांगलाच पसंतीस उतरला आहे. अशात आता या चित्रपटावर 'सुपर ३०'चे रिअल हिरो आनंद कुमार यांची प्रतिक्रिया आली आहे.

आनंद यांनी सर्वप्रथम या चित्रपटातील हृतिकच्या अभिनयाचं कौतुक केलं. या चित्रपटाला देशाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून एक संदेश विद्यार्थ्यांपर्यंत जात आहे आणि जेव्हा लोक म्हणतात, की ते यातून प्रेरित होत आहेत. तेव्हा या चित्रपटाचा उद्देश साध्य झाल्याचं वाटत असल्याचं आनंद कुमार म्हणाले.

दरम्यान हा चित्रपट विद्यार्थ्यांसाठी जिद्द आणि आत्मविश्वासाचे उत्तम उदाहरण असल्यानं बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात आणि दिल्लीसारख्या राज्यांत सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे. आनंद कुमारांचा पापड विकण्यापासून श्रीमंत मुलांना शिकवण्यापर्यंतचा आणि गरीब अभ्यासू मुलांना मोफत शिक्षण देण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात पाहायला मिळतो. चित्रपटाने आतापर्यंत ११३.७१ कोटींची कमाई केली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.