ETV Bharat / sitara

फराह खानने शेअर केला 'दिल चाहता है'चा रंजक किस्सा - चित्रपट दिग्दर्शक फराह खान

'दिल चाहता है' या चित्रपटातील 'वो लडकी है कहां...' हे गाणे आठवत असेल. या गाण्यात पक्ष्यासारखी नाचणारी हुक स्टेप खूप लोकप्रिय झाली होती. ही स्टेप कशी तयार झाली, याचा एक रंजक किस्सा कोरिओग्राफर फराह खानने सांगितला आहे.

'Dil Chahta Hai
'दिल चाहता है'चा रंजक किस्सा
author img

By

Published : Oct 17, 2020, 3:43 PM IST

मुंबई - कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक फराह खानने 2001च्या ब्लॉकबस्टर 'दिल चाहता है' या गाण्यातील 'वो लडकी है कहां' या गाण्यातील लोकप्रिय हुकस्टेपचा एक रंजक किस्सा शेअर केला आहे.

हे गाणे सैफ अली खान आणि सोनाली कुलकर्णीवर चित्रीत करण्यात आले होते आणि फराहने व्हिडीओसाठी रेट्रो मूड निवडला होता.

फराह खान म्हणाली, "मला आठवतेय की, मी गीताला (कपूर) सांगितले होते की, मी गाणे वाजवीन आणि तू काही स्टेप करशील. ती पक्ष्यांसारखे काहीतरी करू लागली आणि आम्ही त्याचे हुक स्टेप तयार केले."

गीता म्हणाली, "मी ती अशीच एक हुक स्टेप केली होती, कारण मला काहीच सुचत नव्हते.''

फराह अलीकडेच गीता कपूर, नृत्यदिग्दर्शक टेरेंस लुईस आणि नर्तक-अभिनेत्री मलाइका अरोरा यांच्या 'इंडियाज बेस्ट डान्सर'च्या रोमान्स स्पेशल एपिसोडसाठी सामील झाली होती.

शोमध्ये फराह म्हणाली, "मला माहीत आहे की, मला तीन मुले आहेत, पण गीता माझे पहिले मुल आहे."

या दोघी बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखत आहेत. गीता यापूर्वी फराह खानची कोरिओग्राफ सहाय्यक म्हणून काम करत होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.