ETV Bharat / sitara

अमृता खानविलकरचा चित्तथरारक स्टंट, व्हिडिओ पाहून आई थक्क - अमृता खानविलकर न्यूज

रोहित शेट्टीच्या 'खतरो के खिलाडी' या कार्यक्रमाचा १० वा सिझन सुरू झाला आहे. यामध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनेही सहभाग घेतला आहे. अलिकडेच तिला एक चित्तथरारक स्टंट साकारण्याचा टास्क देण्यात आला होता.

Amruta Khanvilkar in Khataro ke Khiladi 10, Amruta Khanvilkar's Mother Reaction on her stunt, Amruta Khanvilkar nes, अमृता खानविलकरचा चित्तथरारक स्टंट, अमृता खानविलकर न्यूज, Khataro ke Khiladi 10 news
अमृता खानविलकरचा चित्तथरारक स्टंट, व्हिडिओ पाहून आई थक्क
author img

By

Published : Feb 29, 2020, 8:07 AM IST

मुंबई - काळजाचा ठोका चुकवणारे स्टंट आणि ते साकारण्याची जिद्द ठेवणारे कलाकार रोहित शेट्टीच्या 'खतरो के खिलाडी' या कार्यक्रमात पाहायला मिळतात. सध्या या कार्यक्रमाचा १० वा सिझन सुरू झाला आहे. यामध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनेही सहभाग घेतला आहे. अलिकडेच तिला एक चित्तथरारक स्टंट साकारण्याचा टास्क देण्यात आला होता. हा स्टंट तिने मोठ्या हिमतीने पूर्ण केला. तिचा हा स्टंट पाहून तिची आईदेखील थक्क झाली आहे.

अमृताने स्वत: 'खतरो के खिलाडी' च्या या भागाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिला हेलिकॉप्टरला अडकवलेल्या जाळीवर चढून पुन्हा समुद्राच्या पाण्यात उडी मारण्याचा टास्क देण्यात आला होता. तिच्यासोबत सुप्रसिद्ध डान्सर आणि कोरिओग्राफर धर्मेश देखील होता. दोघांनी हा टास्क पूर्ण केला. हा व्हिडिओ पाहताना तिच्या आईला अमृताचा फार अभिमान वाटत होता. मात्र, त्यासोबत आपल्या लेकीचा स्टंट पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर भीती देखील दिसत होती.

हेही वाचा -स्मृती इराणीने वाढत्या वजनाला धरले करण जोहरला जबाबदार

अमृताने हा व्हिडिओ पोस्ट करुन लिहिलं आहे, की 'मी कधीच विचार केला नव्हता की मी असं काही माझ्या आयुष्यात करेल. माझ्या आईच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून मला जाणवलं की तिला माझा नक्कीच अभिमान वाटत होता. धर्मेश तू नसतास, तर माझं काय झालं असतं', प्रेक्षकांना हा भाग नक्की आवडेल, असंही तिने लिहिलं आहे.

हेही वाचा -जावेद अख्तरांचा शेखर कपूरना टोला, "'मिस्टर इंडिया'ची आयडिया तुमची नव्हती"

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.