मुंबई - सध्या आसाम आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये पुराने कहर केला आहे. यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती मन हेलावणारी आहे. आसाममध्ये आलेल्या पुराचा परिणाम तेथील नागरिकांवर आणि प्राण्यांवर होत आहे. अशा परिस्थितीत बिग बी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले आहेत.
अमिताभ यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५१ लाख रूपयांचा निधी दिला आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी याबद्दलची माहिती देत अमिताभ यांचे आभार मानले आहेत. तुमच्या सहकार्यासाठी आसामच्या जनतेकडून आभार मानतो, असे सोनोवाल यांनी म्हटलं आहे.
-
We appreciate Shri Amitabh Bachchan ji for contributing Rs. 51 lakh to Chief Minister's Relief Fund. This is a great gesture & show of care for the people.
— Sarbananda Sonowal (@sarbanandsonwal) July 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Thank you, on behalf of the people of Assam, for your support. @SrBachchan
">We appreciate Shri Amitabh Bachchan ji for contributing Rs. 51 lakh to Chief Minister's Relief Fund. This is a great gesture & show of care for the people.
— Sarbananda Sonowal (@sarbanandsonwal) July 23, 2019
Thank you, on behalf of the people of Assam, for your support. @SrBachchanWe appreciate Shri Amitabh Bachchan ji for contributing Rs. 51 lakh to Chief Minister's Relief Fund. This is a great gesture & show of care for the people.
— Sarbananda Sonowal (@sarbanandsonwal) July 23, 2019
Thank you, on behalf of the people of Assam, for your support. @SrBachchan
सोनोवाल यांचे हेच ट्विट रिट्विट करत अमिताभने म्हटलं, की आसाम सध्या संकटात आहे. पुरामुळे येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आपल्या भावा-बहिणींची सुरक्षा करा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे त्यांना मदत करा. मी आताच केली. तुम्ही केली का? असं बिग बींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान याआधी अक्षय कुमारनेही आसाममधील पुरग्रस्तांसाठी आणि काझीरंगा अभयारण्यासाठी प्रत्येकी एक-एक कोटी रूपये दिले होते.