मुंबई - आपल्या भारदस्त आवाजाने आणि अभिनयानं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवाणारे बिग बी आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. लवकरच ते एका तामिळ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. आता याचं शीर्षकही निश्चित झालं आहे.
'तेरा यार हूँ मैं' असं या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचं शीर्षक असणार आहे. चित्रपटाच्या सेटवरील अमिताभ यांचे अनेक फोटो समोर आले आहेत. हे फोटो आणि चित्रपटाचं शीर्षक पाहता यात वडिल आणि मुलातील मैत्रीचं नातं उलगडणार असल्याचं दिसत आहे. या फोटोंमध्ये अमिताभ दाक्षिणात्य वेशभूषेत आहेत.
-
Amitabh Bachchan's Hindi-Tamil bilingual gets a title: #TeraYaarHoonMain [#Hindi title]... Costars SJ Suryah and Ramya Krishnan... Directed by T Tamilvanan... Produced by Bhushan Kumar, Divya Khosla Kumar, Krishan Kumar, Om Prakash Bhatt, Sujay Shankarwar and Ami Trivedi. pic.twitter.com/zDJLRnrZ1H
— taran adarsh (@taran_adarsh) April 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Amitabh Bachchan's Hindi-Tamil bilingual gets a title: #TeraYaarHoonMain [#Hindi title]... Costars SJ Suryah and Ramya Krishnan... Directed by T Tamilvanan... Produced by Bhushan Kumar, Divya Khosla Kumar, Krishan Kumar, Om Prakash Bhatt, Sujay Shankarwar and Ami Trivedi. pic.twitter.com/zDJLRnrZ1H
— taran adarsh (@taran_adarsh) April 8, 2019Amitabh Bachchan's Hindi-Tamil bilingual gets a title: #TeraYaarHoonMain [#Hindi title]... Costars SJ Suryah and Ramya Krishnan... Directed by T Tamilvanan... Produced by Bhushan Kumar, Divya Khosla Kumar, Krishan Kumar, Om Prakash Bhatt, Sujay Shankarwar and Ami Trivedi. pic.twitter.com/zDJLRnrZ1H
— taran adarsh (@taran_adarsh) April 8, 2019
चित्रपटात अमिताभ यांच्याशिवाय एस जे सूर्या आणि राम्या कृष्णन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. भूषण कुमार, दिव्या खोशला कुमार, क्रिशन कुमार, ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार आणि अमी त्रिवेदी यांची निर्मिती असणार आहे. तमिलवानन दिग्दर्शित हा चित्रपट हिंदी आणि तामिळमध्ये प्रदर्शित होईल.