ETV Bharat / sitara

सहा निगेटिव्ह गोष्टींपासून सावध राहण्याची अमिताभ यांची चाहत्यांना सूचना

मुंबईतील रूग्णालयात कोरोनाचे उपचार घेत असलेल्या बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांसाठी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. नकारात्मकतेच्या स्त्रोतांपासून आपल्या चाहत्यांना सावध करण्यासाठी बच्चन यांनी ट्विट केले आहे.

Amitabh Bachchan
अमिताभ बच्चन
author img

By

Published : Jul 16, 2020, 12:36 PM IST

मुंबई - सध्या मुंबईच्या नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोनव्हायरसवर उपचार घेत असलेल्या मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी एक वक्तव्य शेअर केले आहे. लोकांनी आत्मनिरीक्षण करावे आणि आयुष्यातील निगेटिव्ह "ट्रेंडसेटर" काढून टाकण्याचे आवाहन त्यांनी ट्विटमध्ये केले आहे.

  • T 3595 -
    *ईर्ष्यी घृणी त्वसंतुष्ट: क्रोधनो नित्यशड्कितः।*
    *परभाग्योपजीवी च षडेते दुखभागिनः।।*

    सभी से ईर्ष्या, घृणा करने वाले, असंतोषी, क्रोधी, सदा संदेह करने वाले और पराये आसरे जीने वाले ये छः प्रकार के मनुष्य हमेशा दुखी रहते हैं। अतः यथा संभव इन प्रवृत्तियों से बचना चाहिए।

    — Amitabh Bachchan (@SrBachchan) July 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अमिताभ यांनी आपल्या विस्तारित कुटुंबातील सदस्यांना शुभेच्छा देण्याचा दिनक्रम पाळला आहे. नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी संस्कृतमधील एक कोट शेअर केला असून त्याचा अर्थही सांगितला आहे.

  • T 3595 (i) -
    They that express jealousy, they who ever dislike all others, who remain dissatisfied, angered, ever doubting .. those who live off others .. these 6 kinds of individuals shall remain filled with sadness .. whenever possible save ourselves from such trend setters ..

असंतोष, राग, मत्सर, नापसंती, राग आणि शंका अशा सहा नकारात्मक प्रवृत्तीपासून सावध राहण्याचा इशारा बच्चन यांनी दिला आहे. "जे लोक इतरांबद्दल मत्सर, नापसंती, असंतोष, संताप आणि संशय व्यक्त करतात आणि जे इतरांना सोडून जातात.. हे सहा प्रकारचे लोक नेहमीच दुः खाने भरलेले असतात. म्हणूनच जेव्हा शक्य असेल तेव्हा अशी वैशिष्ट्ये असलेल्या लोकांपासून स्वत: ला वाचवा ", असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

हेही वाचा - डॉक्टर अन् नर्सेस म्हणजे, ''पूजा-दर्शनाच्या स्थानी फडकणारे मानवतेचे झेंडे'' - अमिताभ बच्चन

बिग बीशिवाय त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन, सून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांनाही या आठवड्याच्या सुरुवातीला कोरोनाची बाधा झाली आहे. अमिताभ यांची पत्नी जया बच्चन यांची कोव्हिड-१९ चाचणी निगेटिव्ह आली होती. अभिषेकसह सिने आइकॉन अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये आहेत, तर ऐश्वर्या आणि आराध्या घरात क्वारंटाईन आहेत. अमिताभ यांची कोव्हिड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर सोशल मीडियावर ते बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.